Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका दूध संघाचे ३७ कोटी रुपये बँकेत वर्ग – रणजीतसिंह देशमुख
शेती व सहकार

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका दूध संघाचे ३७ कोटी रुपये बँकेत वर्ग – रणजीतसिंह देशमुख

राज्यातील अग्रगण्य दूध संस्था
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2024Updated:24/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २४ ऑक्टोंबर 

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया (राजहंस दूध) दूध उत्पादक, कर्मचारी आदींच्या बँक खात्यावर ३७ कोटी रुपये वर्ग केले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली आहे.

दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरविलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर संघामार्फत दूध उत्पादकांना दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दूधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी आदींचा यात समावेश आहे.

देशमुख म्हणाले, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल कायमच कौतुकास्पद राहिलेली आहे. दूध संघाची मागील वर्षाची उलाढाल ५३८.१० कोटी रूपये झाली.

दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर फरक अदा करण्यात येतो. दूध संघाचे गुणवत्तेचे कामकाज व पारदर्शक कारभार यामुळे तालुक्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली असून दूध उत्पादकांनी सहकारावर सातत्याने विश्‍वास ठेवलेला आहे.

दिपावली सणानिमित्त दूध उत्पादक व कामगारांना बोनस रक्कम अदा होत असल्यामुळे दूध उत्पादक, कामगार व व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे. संगमनेर तालुक्यात सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यानी अथक परिश्रम घेऊन सहकारी संस्था स्थापन केल्या. त्यांचे अथक प्रयत्नामुळे सहकारी संस्थांची प्रगती झाली. दूध उत्पादक सभासदांचे सातत्याने हित जोपासतांना दूध उत्पादकांना फायद्याचे ठरतील असेच निर्णय घेतले जातात.

संगमनेर दूध संघाचे दिपावलीनिमित्त वरील प्रमाणे दूध दर फरक अदा करण्याचा निर्णय माहे ऑगष्ट महिन्यात झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक सभेत व संचालक मंडळाच्या सभेत घेतलेला आहे.

तालुक्यातील प्राथमिक सहकारी दूध संस्थांना किफायतशीर दूध भाव मिळणेकामी संगमनेर दूध संघास स्वच्छ व निर्भेळ दुधाचा पुरवठा करावा असे आवाहन संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 716
बाळासाहेब थोरात बोनस रणजीतसिंह देशमुख राजहंस दूध
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.