Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चांगला सहकार आणि निर्माण झालेली चांगली संस्कृती पुढील काळात जपा – आमदार बाळासाहेब थोरात कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन ३०१५ रुपयांचा भाव
शेती व सहकार

चांगला सहकार आणि निर्माण झालेली चांगली संस्कृती पुढील काळात जपा – आमदार बाळासाहेब थोरात कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन ३०१५ रुपयांचा भाव

विखे पिता पुत्रांवर टीका टाळली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2024Updated:24/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २६ ऑक्टोंबर 

संगमनेर – संगमनेर तालुक्यात विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून चांगला सहकार आणि निर्माण झालेली चांगली संस्कृती यापुढील काळात जपायची असल्याचे प्रतिपादन करताना सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी ३०१५ रुपयांचा मागील हंगामाचा प्रति टनाचा ऊस भाव माजी मंत्री, काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला.

गुरुवारी थोरात यांच्या हस्ते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात यांच्यासह सहकारातील संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था काम करत असून या संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण झाली आहे. एकरी जास्तीत जास्त उत्पादन वाढवताना कार्यक्षेत्रात १० लाख टनापेक्षा जास्त  ऊस निर्माण झाला पाहिजे. कमी क्षेत्र आणि कमी पाण्यामध्ये एकरी जास्तीत जास्त उत्पादन झाले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

सहकारी संस्थांमुळे संगमनेरची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. येथील अर्थव्यवस्था, समाजजीवन आणि प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा नक्की प्रभाव दिसत आहे. कारखान्याने कायम चांगला भाव दिला असून यामुळे शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी या सर्वांमध्ये आनंद आहे. थोरात कारखान्यावर शेतकरी ,सभासद, आणि कार्यक्षेत्राबाहेरी ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास असून हा विश्वास हेच कारखान्याचे भांडवल आहे.

निळवंडेच्या पाण्यामुळे दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी याचा नक्कीच लाभ होणार आहे. दूध संघाने सातत्याने चांगला भाव दिला असून प्रति लिटर एक रुपयाप्रमाणे रिबिट जाहीर करून नुकतेच ३८ कोटी रुपये बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्यानेही यापूर्वी २८०० रुपये प्रति टन भाव दिला असून दिवाळीनिमित्त २१५ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असून मागील हंगामातील ऊसाला प्रति टन ३०१५ रुपये असा भाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कार्यक्रमासाठी सभासद ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान…

थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम ऊस उत्पादक, सभासद यांचे हीच जोपासण्याबरोबर कामगारांच्या जीवनातही आनंद निर्माण केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळीनिमित्त कारखान्याच्या सर्व कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

थोरातांनी विखे पिता-पुत्रांवर टीका टाळली…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यात ते आमदार बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात यांच्यावर थेट टीका करत असताना थोरात या ठिकेला काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले होते. मात्र कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमात थोरात यांनी यावर कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,233
गळीत हंगाम गळीत हंगाम शुभारंभ थोरात कारखाना बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.