Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरातांविरोधात वंचित मनसेचे उमेदवार जाहीर महायुतीचा अद्यापही पेच, शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याची परंपरा कायम!
पत्रकारिता

बाळासाहेब थोरातांविरोधात वंचित मनसेचे उमेदवार जाहीर महायुतीचा अद्यापही पेच, शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याची परंपरा कायम!

संगमनेर विधानसभा निवडणूक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2024Updated:28/10/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २८ ऑक्टोबर
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता मंगळाच्या अखेरचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी उरला असल्याने अद्यापही संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातील महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. शेवटच्या क्षणी थोरात यांच्या विरोधातील उमेदवार विरोधकांकडून जाहीर केला जात असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी उमेदवाराची मोठी दमछाक होत असते. या उलट वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार जाहीर केले आहे.गेल्या चार दशकांपासून बाळासाहेब थोरात या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. त्यांच्या विरोधात विरोधकांनी अनेकदा आग पाखड करत मैदानात शड्डू ठोकले मात्र निवडणूक जिंकण्यात त्यांना अपयश आले आहे. निवडणूक लागली की विरोधकांकडून एक चेहरा निश्चित न होता अनेक जण उमेदवारीचे दावेदार राहतात. त्यांच्यापैकी कोणाला एकाला उमेदवारी मिळाल्यास उर्वरित नाराज निवडणुकीत फारसे सक्रिय राहत नाही, विरोधकांमधील मतभेद हे थोरात यांच्या कायमच पथ्यावर पडत आले आहे.लोकसभा निवडणुकीत थोरात यांनी अहमदनगर दक्षिण मतदार संघात लक्ष घालत आपली यंत्रणा सुजय विखे यांच्या पराभवासाठी कामाला लावली होती. याचा फायदा खासदार निलेश लंके यांना होऊन ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. थोरात यांच्या माध्यमातून निलेश लंके यांनी केलेला पराभव जिव्हारी लागल्याने माजी खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून संगमनेर विधानसभा मतदारसंघात टायगर अभी… या घोषणेने थोरात यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात सुजय विखे यांनी यश मिळविले होते.मात्र धांदरफळ खुर्द येथे झालेल्या विखे यांच्या मेळाव्यात त्यांच्याच व्यासपीठावरून अध्यक्षस्थानी असलेल्या भाजप नेते वसंत देशमुख यांनी थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केवळ मतदार संघातच नव्हे तर राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे विखे पूर्णता बॅक फूटवर गेले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण जयश्री थोरात यांच्या विषयी काढलेल्या अनुद्गारामुळे तापलेले आहे.रविवारी रात्री झालेल्या अंभोरे येथील सभेत विखे यांनी पुन्हा एकदा वातावरण बदलविण्याचा प्रयत्न केला. मात्र संगमनेरच्या जागे संदर्भात आता मतदारसंघात वेगळेच कुजबूज सुरू झाल्याने विखे यांच्या सभांचा विरोधी उमेदवाराला कितपत फायदा होईल हे याच्या काही दिवसात स्पष्ट होईल.
या मतदारसंघात विरोधी उमेदवारीचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच निवडणुकीत दिसून आला आहे. अंतिम क्षणी विरोधी उमेदवार जाहीर केला जात असल्याने उमेदवाराला प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यावेळी तर ही जागा महायुतीतील नेमक्या कोणत्या घटक पक्षाच्या वाटेला जाणार हेच अद्याप निश्चित नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे संगमनेरची ही जागा कोणत्या पक्षाकडे जाते हे निश्चित झाल्यानंतरच उमेदवार ठरेल. विरोधकांचे या मतदार संघात धनुष्यबाण राहणार की कमळ हे देखील यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे थोरात यांच्या विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्जही अखेरच्या दिवशी शेवटच्या क्षणी दाखल होईल.

वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ठरले… संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला. वंचित बहुजन आघाडीकडून अजीज व्होरा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून योगेश सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महायुतीची जागा कोणाच्या वाट्याला अद्यापही स्पष्ट नाही… भगवंतराव मोरे विरोधी उमेदवार असण्याची शक्यता
महायुतीत संगमनेरच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने धावा सांगितला असला तरी अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघात घेतलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून ते स्वतः उमेदवार असतील आणि भाजपकडे ही जागा जाईल अशी चिन्हे दिसत होती. मात्र मतदारसंघातील बदलत्या घडामोडीचा अंदाज घेता ही जागा शिंदे सेनेकडे कायम असल्याचे संकेत मिळत असून शिंदेसेनेकडून या जागेवर निवृत्त पोलीस अधिकारी भगवंतराव मोरे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चेने वेग पकडला आहे. असे घडल्यास निवडणूक लढविण्यासाठी तयारी केलेल्या भाजपच्या इच्छुकांचा हिरमोड होण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,129
उमेदवार निवडणूक विश्लेषण वार्तापत्र विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.