Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १४८ जागा घेऊनही भाजपने मित्र पक्षाच्या बळकावल्या १७ जागा, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर केले स्वतःचेच उमेदवार उभे… संगमनेर, नेवासेसह या जागांचा समावेश
निवडणूक

१४८ जागा घेऊनही भाजपने मित्र पक्षाच्या बळकावल्या १७ जागा, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर केले स्वतःचेच उमेदवार उभे… संगमनेर, नेवासेसह या जागांचा समावेश

महायुतीत भाजपचाच वरचष्मा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/11/2024Updated:02/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ०१ नोव्हेंबर

महायुती सर्वाधिक १४८ जागा घेऊन देखील मित्र पक्षांचा सतरा जागांवर भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे तब्बल १६५ उमेदवार मैदानात उतरले आहे. यात पहिल्या नगर जिल्ह्यात भाजपच्या वसंत देशमुख या नेत्याच्या बेताल वक्तव्यामुळे सर्वाधिक चर्चेचा ठरलेल्या संगमनेरसह नेवासे मतदारसंघाचा समावेश आहे.

संगमनेरमध्ये महायुतीकडून भाजपचे अमोल खताळ आणि नेवासेमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. शिवसेनेला मिळालेल्या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येकी पाच-पाच जागांवर भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागांवर शिवसेनेकडे मेरीट नसलेले, निवडून येण्याचे क्षमता नसलेले आदी कारणावरून आपलेच उमेदवार उभे करण्यात भाजपला यश आले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व पक्षांच्या तुलनेत भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवत आहे. महायुतीत तीन मोठ्या घटक पक्षांसोबत काही लहान पक्षांचादेखील समावेश आहे. तर महाविकास आघाडीतही तसंच गणित आहे. असं असलं तरी काँग्रेस आणि ठाकरे गटापेक्षा जास्त जागांवर भाजप निवडणूक लढवत आहेत.

महायुतीत भाजपची बार्गेनिंग पावर जास्त असल्याने भाजप आपल्या १४८ उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडून आणण्यासाठी पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. भाजप पक्ष एवढ्यावरच थांबला नाही तर पक्षाच्या तब्बल १७ जणांना मित्र पक्षांमध्ये प्रवेश करायला सांगत त्यांना शिवसेनेच्या धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढायला लावल आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, महायुतीत भाजपनं सर्वाधिक १४८, शिंदेंच्या शिवसेनेनं ८०, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ५३, मित्रपक्षांनी ५ जागांवर उमेदवार जाहीर केले. २ जागांची चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. ७ जागांवर महायुतीचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. मविआत काँग्रेसने १०३, ठाकरेंच्या शिवसेनेनं ८९, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ८७, मविआच्या मित्रपक्षांनी ६ जागा घोषित केल्या आहेत. ३ जागांवरचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. तर ४ जागांवर मविआतीलच उमेदवार एकमेकांच्या आमने-सामने आहेत.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले भाजप उमेदवार…

कुडाळमधून निलेश राणे

पालघरमधून राजेंद्र गावित

भिवंडी पूर्वेतून संतोष शेट्टी

अंधेरी पूर्वेतून मुरजी पटेल

मुंबादेवीतून शायना एन. सी.

बोईसरमधून विलास तरे

करमाळ्यातून दिग्विजय बागल

नेवासातून विठ्ठल लंघे

बाळापुरातून बळीराम शिरसकर

धाराशीवमधून अजित पिंगळे

संगमनेरातून अमोल खताळ

कन्नडमधून संजना जाधव

राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उभे असलेले भाजपचे उमेदवार…

लोहा कंधारमधून प्रतापराव चिखलीकर

वाळवा-इस्लामपूरमधून निशिकांत पाटील

तासगाव-कवठेमहांकाळमधून संजयकाका पाटील

अर्जुनी मोरगावातून राजकुमार बडोले 

कलिनामधून आठवले गटाचे उमेदवार अमरजीत सिंह हे देखील मूळ भाजपचेच आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,109
भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शिवसेना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.