Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जनतेला त्रास देणाऱ्या खबऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, मंत्रीपदाचे स्टेटस कमी करणाऱ्या महसूल मंत्र्यांनी पार कोतवालाला फोन केले! – थोरात
निवडणूक

जनतेला त्रास देणाऱ्या खबऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, मंत्रीपदाचे स्टेटस कमी करणाऱ्या महसूल मंत्र्यांनी पार कोतवालाला फोन केले! – थोरात

मताधिक्य देत तालुका काँग्रेस मागे असल्याचे राज्याला दाखवून द्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आपण वाटेला जात नाही आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू

खांडेश्वर महादेव मंदिरात जल्लोषात आमदार थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मंगळवार ०५ नोव्हेंबर

संगमनेर – यावेळची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी गाजत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास या बळावर आपण सर्वोच्च पदावर असताना काही लोक जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी तालुक्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. चांगली घडी विस्कटित करण्यासाठी प्रयत्न केले, सभा घेतल्या. आता तालुक्यातील जनतेला त्रास देणाऱ्या खबऱ्यांना आणि त्यांच्या मागे असलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू हे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आणि सलग चार दशके संगमनेरचे नेतृत्व करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
खांडगाव येथील खांडेश्वर मंदिरात सोमवारी थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी आदींसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले, १९७८ पासून खांडेश्वराच्या चरणी नारळ अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्याची आपली पद्धत आहे. परमेश्वरासह जनतेचा आशीर्वाद यामुळे सातत्याने मोठे यश मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीला अतिशय चांगले वातावरण आहे.आपण राज्यात सर्वाधिक काळ मंत्रीपदावर राहिलो. मात्र या पदाला एक महत्व असते. सध्याच्या महसूल मंत्र्यांनी तर या पदाचे स्टेटस (महत्त्व) कमी करून टाकले आहे. तालुक्यातील धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी अशी होती. महिला भगिनीचा अपमान करणारी होती. या सभेनंतर तालुक्यातील महिलांचा उद्रेक झाला आणि त्यांनी तो अनुभवला.
राजकारणात तत्त्वज्ञानावर बोलायला हवं, मात्र खालच्या पातळीचे राजकारण हा तालुका कधीही सहन करत नाही. बेताल वक्तव्य करणारे देशमुख दोशी आहेतच मात्र त्याबरोबरच स्टेजवर बसलेले आणि टाळ्या वाजवून त्या घटनेला समर्थन देणारे सर्वजण या घटनेला जबाबदार आहे.
गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकल्या गेल्या. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. गोरगरीब जनतेच्या अन्नात माती कालवण्याचाही प्रयत्न झाला. या सगळ्यांच्या पाठीशी समोर असलेला प्रमुख खबऱ्या आहे, आता त्याला त्याची जागा दाखवा.
ही निवडणूक चांगल्या पद्धतीने सांभाळा, राज्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन संगमनेर तालुका काँग्रेस मागे उभा आहे, हे संपूर्ण राज्याला दाखवून द्या, असे आवाहन करत संगमनेर तालुका शांत, सुसंस्कृत आहे. आम्ही कुणावर दादागिरी करत नाही. कुणाची दादागिरी सहन करत नाही. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही आणि जर वाटेला गेलो तर पुरता कार्यक्रम करू, असा इशाराही त्यांनी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,344
प्रचार शुभारंभ बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.