Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विरोधकांचा आत्मविश्वास गेलाय, आमच्या सभांमध्ये जॅमर बसविले जाऊ लागले… आम्ही तुमच्या एवढे वाईट बोलत नाही, का घाबरताय तुम्ही? माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची विखे पिता पुत्रांवर टीका
निवडणूक

विरोधकांचा आत्मविश्वास गेलाय, आमच्या सभांमध्ये जॅमर बसविले जाऊ लागले… आम्ही तुमच्या एवढे वाईट बोलत नाही, का घाबरताय तुम्ही? माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची विखे पिता पुत्रांवर टीका

आश्वीच्या ऐतिहासिक सभेतून परिवर्तन घडणार!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/11/2024Updated:07/11/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ०६ नोव्हेंबर

संगमनेर – तुमचा आत्मविश्वास गेला आहे, तुम्ही भाषणाला घाबरू लागलात त्यामुळे आता आमच्या सभांमध्ये जॅमर बसविले जाऊ लागले आहे. लोकांना म्हणणं देखील ऐकू द्यायचं नाही, नाहीतरी आम्ही तुमच्या एवढे वाईट बोलत नाही, का घाबरताय तुम्ही? अशा झोंबणाऱ्या शब्दात राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर टीका केली.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आश्वी खुर्द येथील सभेत थोरात बोलत होते. डॉ. जयश्री थोरात, प्रभावती घोगरे, शिवसेनेचे सचिन कोते, बाळासाहेब गायकवाड, सचिन चौगुले, सोनल जगताप, प्रतिभा जोंधळे, ॲड. रामदास शेजुळ आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

शिर्डी मतदार संघाशी आमचा काय संबंध असे विचारणाऱ्या विखे पिता पुत्रांना टोला लगावतांना थोरात म्हणाले, मी शिर्डी मतदार संघाचा मतदार असून संगमनेरचा ज्या पद्धतीने विकास केला, ज्या पद्धतीचे राजकारणाचे वातावरण संगमनेरमध्ये आहे ते या मतदारसंघांमध्ये सुद्धा आणण्याचा माझा अधिकार आहे. एका व्यासपीठावर येऊन जनसमुदायासमोर आम्ही संगमनेरमध्ये केलेले काम आणि तुम्ही राहता-शिर्डीमध्ये केलेले काम याची एकदा प्रत्येक मुद्द्यावर तुलनाच होऊन जाऊ द्या, मात्र गडी यावर बोलायला तयार नाही.

‘दहशत से आजादी’ हा कार्यक्रम घेऊन सचिन चौगुले, सचिन कोते या मतदारसंघासाठी एक ऐतिहासिक काम करत आहे. दहशतीचे वातावरण, सुडाच राजकारण मतदार संघात निर्माण करणार असाल तर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. पिण्याच्या पाण्यातही हे लोक राजकारण करत आहे. निवडणुकीत निरनिराळे आमिष घेऊन ते तुमच्याकडे येतील मात्र आमिषाला बळी पडू नका. निवडणूक आयोगाने देखील सर्वांना हेच सांगितले आहे.

खोट्या केसेस करणे, माणसं जेलमध्ये घालावयाचे काम सुरू आहे. हे लोक एवढे बारीक झाले की माझ्या पीएलादेखील प्रसिद्धी देऊ लागले आहे. फसलेल्या वाळू धोरणाबद्दल माझ्या एकाही प्रश्नाला सभागृहात ते उत्तर देऊ शकले नाही. तलाठी भरती बद्दल भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहे मात्र त्याची शहानिशा अद्यापही होत नाही.

मागील साठ वर्ष खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अशी विविध पदे तुमच्याकडे होती. मात्र तरीही तुम्हाला साधी एमआयडीसी करता आली नाही. मृत्यूचा सापळा असलेला नगर-मनमाड रस्ताही तुमच्या सत्ता काळात करता आला नसल्याची टीका थोरात यांनी केली.

प्रभावती घोगरे म्हणाल्या, निवडणुका आल्या की सत्ताधारी अगदी डांबरी रस्त्यावर सुद्धा मुरूम टाकतात. कुटील आणि कारस्थाने करणारे असे विखे घराणे आहे. आमदार थोरात यांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. महाविकास आघाडीची समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मी साधी गृहिणी असून राहता तालुक्यातील दहशतवाद संपवण्यासाठी मी जनतेच्या पाठबळावर उभी असल्याने मला पण साथ द्या.

जयश्री थोरात म्हणाल्या, मी न्याय मागायला गेले आणि माझ्यावरच केसेस टाकल्या. जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्यावर हाफ मर्डरच्या केसेस टाकल्या. हा कुठला सत्तेचा गैरवापर आहे. सत्ता येते आणि जाते मात्र जनता आपली असते. २८ गावे जसे आमदार निवडून आणू शकतात तसे आमदार पाडू शकतात. यावेळेस दहशत मुक्तीसाठी घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 14,039
प्रचार सभा बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणूक शिर्डी विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

04/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.