Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरची निवडणूक का सोडली? सुजय विखेंची कबुली… लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय…
निवडणूक

संगमनेरची निवडणूक का सोडली? सुजय विखेंची कबुली… लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय…

शिराळ चिंचोडीच्या जाहीर सभेत भाष्य
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/11/2024Updated:09/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ९ नोव्हेंबर 

अहिल्यानगर – लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय असं सध्या सुरू आहे. संगमनेरमध्येदेखील माझ्या बाबतीत असंच घडल्याची जाहीर कबुली देत वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली. धांदरफळमधील त्या सभेमुळे आपली संगमनेरमधील संधी हुकली असल्याची कबुली माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे (भाजप) उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारार्थ शिराळ चिंचोडी येथील जाहीर सभेत सुजय विखे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

विखे म्हणाले, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली, असं सांगत सुजय विखेंनी संगमनेर येथील सभेदरम्यान झालेल्या गोंधळाची आठवण काढत टोलेबाजी केली.

जिल्ह्यात थोरात आणि विखे या दोन्ही बड्या घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवत आहेत. विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी तिकीट मिळवण्यासाठी बराच खटाटोप केला, मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही. यावरच सुजय विखे यांनी शिराळ चिंचोडीच्या जाहीर सभेत भाष्य केलंय. काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, माझं काही लोकांसाठी ठीक दिसत नाही. मला बोलावू नका, तुमचं चांगलं चाललंय ते चालू द्या. असं असलं तरी झालं ते झालं आपण काय थकलेलो नाहीत. आपण पुन्हा जोमाने काम करू, असं म्हणत सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले आहेत.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241109-WA0026.mp4

नेमकं काय घडलं होतं धांदरफळच्या सभेत…

सुजय विखे यांनी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली होती. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते आमदार होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद गटांमध्ये सभांचा धडाका सुरू केला होता. या सभांना मोठा प्रतिसाद देखील मिळत होता. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धांदरफळ येथे एका विराट सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेत विखे समर्थक असलेले भाजप नेते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. देशमुख यांच्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा गहजब उडाला होता. त्यानंतरची स्थिती लक्षात घेता विखे यांना संगमनेरमधून तिकीट मिळालं नाही. ही जागा शिवसेनेला सोडावी लागली आणि या जागेवर विखे समर्थक असलेले अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे थोरात यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,711
प्रचार सभा राहुरी विधानसभा वसंत देशमुख विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर बुलडोझर; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई

18/06/2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

05/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.