Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर विधानसभेत वंचितच्या उमेदवाराने वाढविली चुरस… छोट्या-छोट्या सभांच्या माध्यमातून उमेदवार मांडतोय आपली भूमिका
निवडणूक

संगमनेर विधानसभेत वंचितच्या उमेदवाराने वाढविली चुरस… छोट्या-छोट्या सभांच्या माध्यमातून उमेदवार मांडतोय आपली भूमिका

वोहरा यांना मिळतोय चांगला पाठिंबा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ११ नोव्हेंबर 
संगमनेर – मोहसीन शेख
राज्यात विविध समाज त्यांच्या हक्कासाठी वाटत असताना मुस्लिम समाजाने देखील निवडणूक आपल्या स्वाभिमानाची असल्याची जाणीव ठेवत वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्याचे ताकद वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आहे. त्यांची ताकद वाढविण्यासाठी संगमनेर मधून मुस्लिम समाजाने वंचितला मतदान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रस्थापिताविरोधात वंचित बहुजन आघाडीने अब्दुल अजीज वोहरा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुरुवातीलाच वोहरा यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला.
वोहरा वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहे. गावागावात जाऊन छोट्या छोट्या कॉर्नर सभा, त्यांच्या या सभांना मिळणारा प्रतिसाद त्यांच्यासाठी निर्णायक ठरू लागला आहे. या सभांच्या माध्यमातून वोहरा मतदारांपर्यंत वंचितसह स्वतःची भूमिका पोहोचविण्यात यशस्वी ठरले आहे.
मुस्लिम बहुल भागात झालेल्या एका छोट्या कॉर्नर प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले, मुस्लिम समाजाचे राजकीय लढाई सद्य परिस्थितीत ही विकासाची नसून स्वाभिमानाची, मान सन्मानाची आहे हे प्रत्येक मुस्लिम मतदाराने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्यांना आपण मतदान करत आलो त्यांना तुमच्या मताची किती किंमत आहे, हे शहरातील विविध घटनांवरून लक्षात येईल.
त्यामुळे येणाऱ्या काळात जी व्यक्ती आपल्या मतांचा सन्मान करू शकेल अशा व्यक्तीच्याच पर्यायाने वंचित बहुजन आघाडीला तुम्ही साथ देण्याची आवश्यकता आहे. वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी सातत्याने उभी राहील. शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. त्यामुळे मतदान करताना समोर किती प्रतिस्पर्धी बलाढ्य आहे याकडे लक्ष न देता आपल्यासाठी उभ्या राहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,659
अजीज व्होरा वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.