Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणुकीत बहुचर्चित एसटीपी (STP) प्लांटचा मुद्दा बनतोय कळीचा, उमेदवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज… मुस्लिम, ओबीसी समाज वंचितसोबतच – वंचितचे उमेदवार अजीज वोहरा
निवडणूक

निवडणुकीत बहुचर्चित एसटीपी (STP) प्लांटचा मुद्दा बनतोय कळीचा, उमेदवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज… मुस्लिम, ओबीसी समाज वंचितसोबतच – वंचितचे उमेदवार अजीज वोहरा

वंचितच्या प्रचाराने निवडणुकीत वाढली रंगत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2024Updated:15/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, १५ नोव्हेंबर

संगमनेर – मोहसीन शेख

संगमनेर विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजासाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा बहुचर्चित एसटीपी (STP) प्लांटचा मुद्दा कळीचा बनला आहे. विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य प्रमुख उमेदवारांनी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुस्लिम समाजातून होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी यासंदर्भात समाजासोबत राहण्याचे आश्वासन दिल्याने त्यांना समाजातून पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते वोहरा यांच्या पारड्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम चरणाकडे जात असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी विविध समाजातील बहुचर्चित प्रश्नांवर बोट ठेवत त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत असल्याने मतदारांचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे जाताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या तुलनेत वोहरा यांच्याकडे प्रचाराची साधनसामग्री, कार्यकर्त्यांचे संख्याबळ कमी असले तरी ते मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीने या मतदार संघातून मुस्लिम समाजातील चेहरा म्हणून अजित वोहरा यांना उमेदवारी दिली असली तरी विविध त्यांचा असलेला स्नेह लक्षात घेता त्यांना विविध समाजातून पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम दलित ओबीसी आधी समाजातील निर्णायक मते आपल्याकडे वळविण्यात ते यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. शहरासोबतच ग्रामीण भागात वोहरा यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. छोट्या-छोट्या कॉर्नर सभा, मीटिंग, पदयात्रा आदींच्या माध्यमातून आपल्या वकृत्व आणि संभाषणाच्या द्वारे वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका, जाहीरनामा, वंचित ने आतापर्यंत केलेली वाटचाल याबद्दल प्रखरपणे बाजू मांडताना दिसत आहे.

एकीकडे हे चित्र असले तरी दुसरीकडे गेल्या चार दशकांपासून येथील मुस्लिम समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यासोबत सातत्याने राहिला आहे. समाजातील बहुतांशी आजी-माजी नगरसेवक, इतर पदाधिकारी सद्यस्थितीत थोरात यांच्यासोबत दिसत असले तरी पूर्वीच्या तुलनेत मुस्लिम समाज थोरात यांच्यासोबत दिसत नाही. यामागे समाजातील काही प्रश्न असून विशेषत: एसटीपी प्लांटच्या बहुचर्चित प्रश्नासंदर्भात त्यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही याबद्दल समाजात नाराजी आहे. हे नाराजी मतांच्या रूपाने वंचितचे उमेदवार वोहरा आपल्या पारड्यात वळविण्याची शक्यता आहे.

एसटीपी प्लांट च्या विषयावर समाजाच्या नागरिकांनी ५२ दिवसांचे साखळी उपोषण केले, ८-१० हजार नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याची दखल घेत तत्कालीन प्रांताधिकारी कथा नगरपालिका प्रशासक शशिकांत मंगरुळे, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी उपोषण स्थळी भेट देत ऑगस्ट २०२२ मध्ये लेखी पत्र देत नियोजित जागेत एसटीपी प्लांट चे काम स्थगित करत असल्याचे स्पष्ट केल्याने उपोषण मागे घेण्यात आले. मात्र या संदर्भात ज्यांच्याकडून समाजाला अपेक्षा आहे त्या आमदार थोरात यांनी यासंदर्भात अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने समाजात नाराजीचे वातावरण आहे.

समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी वगळता सामान्य समाज मात्र नेहमी आंदोलनातून मुस्लिम ओबीसी वंचित घटकांसाठी स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या वंचितचे उमेदवार अजीज वोहरा यांच्या प्रचारात दिसत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 960
अजीज व्होरा वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.