Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील सात गावांत अद्ययावत एस.टी. प्रवासी निवारा शेड उभारणार; आमदार अमोल खताळ

19/11/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय

19/11/2026

गद्दारांच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला! संगमनेरमध्ये शिवसैनिकांचा संताप; शायना एनसी आणि निरुपम यांच्या प्रतिमेला जोडेमार

19/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्र्यांकडून माध्यमांना कोट्यावधी रुपयांच्या ‘पेड न्यूज’, मराठी गुजराती व उर्दू वृत्तपत्रांचा समावेश! धक्कादायक पुराव्यासह ‘स्प्राऊट्स’ने दिली माहिती
निवडणूक

मुख्यमंत्र्यांकडून माध्यमांना कोट्यावधी रुपयांच्या ‘पेड न्यूज’, मराठी गुजराती व उर्दू वृत्तपत्रांचा समावेश! धक्कादायक पुराव्यासह ‘स्प्राऊट्स’ने दिली माहिती

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2024Updated:15/11/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, १५ नोव्हेंबर 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १६ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल ७० हून अधिक वृत्तपत्रांना ‘पेड न्यूज’ देण्यात आलेल्या आहेत व त्यासाठी कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम देण्यात आली, अशी धक्कादायक पुराव्यासह माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे. या संदर्भातील त्यांची ट्विटरवरील पोस्ट समाज माध्यमात व्हायरल होत आहे.

काय म्हटले आहे यात…

निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी सुमित शेलार या पुण्यातील व्यक्तीची निवड केली. या शेलारने मुंबईतील एका जाहिरात एजन्सीला हाताशी धरले व महाराष्ट्रातील जवळपास ७० हून अधिक मराठी, गुजराथी व उर्दू या तीन भाषेतील वृत्तपत्रांची यादी गोळा केली. या वृत्तपत्रांना त्यांनी दररोज बातम्या द्यायला सुरुवात केली. त्यानुसार ‘लाडकी बहीण योजना’, ‘शेतकऱ्यांना वीजमाफी’, ‘शेतकऱ्यांना कृषिपंप’, ‘मराठा आरक्षण’, ‘वयोश्री योजना’ ‘मुख्यमंत्र्यांनी केलेली विकास कामे’ या विषयांवरील बातम्या दररोज प्रसिद्ध करण्यात आल्या.

महाराष्ट्रातील वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या या बातम्यांतील मजकूर हा जवळपास सारखाच होता. काही संपादक हे उपसंपादकांना सूचना द्यायचे व बातमीमध्ये थोडाफार फेरफार करायचे. मात्र बहुतांशी वृत्तपत्रे हा मजकूर जसाच्या तसा म्हणजेच कोणताही फेरफार न करता सारखाच मजकूर प्रसिद्ध करायचे. या सर्व बातम्या या पेड न्यूज या प्रकारात मोडतात. त्यामुळे मतदार प्रभावित होवू शकतात.

‘लोकप्रतिनिधी कायदा – १२६  म्हणजेच People’s Representation Act- 126 व भारतीय न्याय संहिता १७४ व १७५ या कलमांनुसार हा कायदेशीर गुन्हा आहे.

या पेड न्यूज प्रसिद्ध करण्यासाठी प्रत्येक वृत्तपत्राला प्रतिदिवस जवळपास ५० हजार रुपयांच्या आसपास रक्कम देण्याचे कबूल करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात त्यांना निम्म्याहून कमी रकमेचे पैसे देण्यात आले. याशिवाय या रकमेवर १५ टक्के रक्कम कमिशन म्हणून कापून देण्यात आली.

‘पेड न्यूज’ प्रसिद्ध करणे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे. विशेषतः निवडणुकीच्या काळात म्हणजेच आचार संहिता लागल्यानंतर मतदारांना प्रभावित करण्यासाठी अशाप्रकारे ‘पेड न्यूज’ प्रकाशित करणे हा तर मोठा गुन्हा आहे. हा गैरप्रकार सर्वप्रथम ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी) लक्षात आला. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला, त्यानंतर त्वरित कारवाई करण्यात आली व या पेड न्यूज ११ नोव्हेंबरपासून प्रकाशित करणे त्वरित थांबवण्यात आले.

‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम व मुख्य तक्रारदार मंगला वाघे यांनी यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व राज्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांच्याकडे तक्रार केलेली आहे. यासंबंधीचे सर्व पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहेत.

याबाबत प्रतिक्रियेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे खासगी सचिव सचिन जोशी यांना वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी सवयीप्रमाणे फोन उचलला नाही. सुमित शेलार यांनीही फोन उचलला नाही. निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी फोनही उचलला नाही व ‘एसएमएस’ला उत्तरही दिले नाही.

Chief Minister Eknath Shinde’s Multi-Crore ‘Paid News’ Scandal

Over 70 Newspapers, Including Marathi, Gujarati, and Urdu Publications, Paid for Propaganda@unmeshgujarathi @sproutsnews
Sprouts Exclusive

In a shocking revelation just ahead of the upcoming assembly elections,… pic.twitter.com/K1CUGQC3MR

— Sprouts News (@sproutsnews) November 14, 2024


https://x.com/sproutsnews/status/1857079504998461748?s=19

निवडणूक आयोग ‘मॅनेज’ होण्याची शक्यता अधिक…

‘मुंबई ही ‘पेड न्यूज’ची राजधानी आहे,’ असे वक्तव्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होण्यापूर्वीच केले होते. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या वर्तुळात एकच खळबळ उडालेली होती. हे गैरप्रकार प्रत्येक निवडणुकीत होत असतात, मात्र यंदा दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याने निवडणूक आयोग ‘मॅनेज’ होण्याची शक्यता अधिक आहे, असे यात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 688
एकनाथ शिंदे पेड न्यूज स्प्राऊट्स
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

रविवार विशेष लेख — शिंदेंच्या बदनामीसाठी जरांगेंच्या खांद्यावर ५०० कोटींचं ओझं…!

25/10/2026

‘गोकुळ’वर बंटी पाटलांचाच गुलाल! महायुतीचा सुफडा साफ; हसन मुश्रीफांच्या मुलासह दिग्गज ‘आऊट’, अजिंक्यतारावर दसऱ्याआधीच दिवाळी!

19/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर तालुक्यातील सात गावांत अद्ययावत एस.टी. प्रवासी निवारा शेड उभारणार; आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar19/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील एसटी प्रवाशांची ऊन, वारा आणि पावसापासून होणारी गैरसोय आता…

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय

19/11/2026

गद्दारांच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला! संगमनेरमध्ये शिवसैनिकांचा संताप; शायना एनसी आणि निरुपम यांच्या प्रतिमेला जोडेमार

19/11/2026

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

19/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.