Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोदी-शहांच्या आव्हानानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल पोस्ट लिहीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना वाहिली आदरांजली, या पोस्टवर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष
Uncategorized

मोदी-शहांच्या आव्हानानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल पोस्ट लिहीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना वाहिली आदरांजली, या पोस्टवर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष

मोदी-शहा यांच्या आव्हानाला राहुल, प्रियांकाने दिले उत्तर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2024Updated:17/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १७ नोव्हेंबर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतीदिन आहे आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत पोस्ट लिहून आदरांजली व्यक्त केली आहे. या पोस्टवर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं की बाळासाहेब ठाकरेंसाठी दोन शब्द तरी राहुल गांधींकडून वदवून दाखवा. त्यामुळे राहुल गांधी यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातले नेतेमंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शनिवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी शिर्डीत आल्या होत्या त्यावेळी देखील त्यांनी मोदी-शहांच्या भाषणांचा दाखला देत महाराष्ट्र ही संतांची आणि शिवरायांची भूमी आहे. मात्र शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान मोदी व भाजप सरकारने केला आहे. त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे या भूमीमधील आहे. मोदी यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारते आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेते. आता माझे चॅलेंज आहे की मोदी व भाजप सरकारने जातीनिहाय जनगणना करावी.

दरम्यान मोदी-शहा यांच्या आव्हानानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. आज ठाकरेंच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त गांधी यांनी पोस्ट लिहून आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना परिवाराबद्दल माझ्या संवेदना आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राहुल यांनी सांगितलेल्या या दोन ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

नेमकं काय म्हणाले होते मोदी-शहा… काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना आव्हान दिलं होतं की आघाडीच्या सहकाऱ्यांना आव्हान देतो. हिंमत असेल तर युवराजच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंची थोडी स्तुती करून दाखवा. कॉंग्रेस हा असा पक्ष आहे ज्याचे ना धोरण आहे ना हेतू.

Remembering Balasaheb Thackeray ji on his 12th death anniversary. My thoughts are with Uddhav Thackeray ji, Aditya and the entire Shiv Sena family.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 17, 2024

पोस्टमध्ये काय म्हणाले राहुल गांधी…

राहुल गांधी यांनी पोस्ट करत लिहिलं की, बाळासाहेब ठाकरे यांची आज १२ वी पुण्यतिथी आहे. यामुळे त्यांची आठवण येत आहे. माझे विचार आणि संवेदना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच संपूर्ण शिवसेना कुटुंबासह आहेत. असे राहुल गांधी यांनी लिहून त्यांच्या भावना व्यक्त करत बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या पोस्टवर भाजप काय प्रतिक्रिया देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 725
अमित शहा नरेंद्र मोदी प्रियंका गांधी बाळासाहेब ठाकरे राहुल गांधी शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

21/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.