Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये २१ फेऱ्यांत मतमोजणी, पारदर्शक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे
निवडणूक

संगमनेरमध्ये २१ फेऱ्यांत मतमोजणी, पारदर्शक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे

हिंगे यांनी दिली मतमोजणी संदर्भात माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2024Updated:22/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार २२ नोव्हेंबर – संगमनेर 

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी उद्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ८.०० वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडासंकुल येथे होणार आहे. २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत असून पारदर्शक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी “महाराष्ट्र संवाद न्यूज”ला दिली आहे.

संगमनेर मतदार संघाचा निकाल दुपारपर्यंत अपेक्षित आहे. बुधवारी एकुण २८८ मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पाडली. मतदान प्रक्रियांमध्ये कोणताही अनुचित प्रकार समोर आला नाही. १४७ मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून वेबकास्टिंग करण्यात आले.

यामुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणाऱ्या रांगा व मतदान केंद्रातील तसेच मतदान केंद्राबाहेरील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने उत्तम नियोजन करण्यात आले होते. संगमनेर विधानसभेसाठी २८८ मतदान केंद्रामध्ये एकूण ७५.१९% इतके मतदान झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक (जनरल) यांचे उपस्थितीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासमवेत शुक्रवारी केंद्रनिहाय सकाळी ११.०० वाजता नमुना १७ अ बाबतची छाननी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. उपस्थित उमेदवार, निवडणुक प्रतिनिधी यापैकी कोणीही प्रक्रियेवर आक्षेप घेतला नाही.

निवडणूक आयोगाने संगमनेर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व त्यावर नियंत्रण करणेकामी सुशील सिंह, निवडणूक निरीक्षक (मतमोजणी) यांची नेमणुक केलेली आहे.

मतमोजणी प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी प्रक्रियेसाठी ईव्हीएमसाठी १४ टेबल, पोस्टल बॅलेटसाठी ९ टेबल व ETPBS साठी ५ टेबल असे एकूण २८ टेबल लावण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर १ सुक्ष्म निरीक्षक, १ पर्यवेक्षक व १ सहाय्यक असे एकुण ९५ अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष मोजणीसाठी नियुक्त केले आहे. सदर मतमोजणी प्रक्रियेत २१ फेऱ्या पार पडणार आहेत.

मतमोजणी कामी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच मिडिया सेलची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार असून बंदोबस्तासाठी स्थानिक पोलीस व मध्यप्रदेश मधील सीआरपीएफच्या जवानांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी केंद्रापासून २०० मीटरच्या आत अधिकृत व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच भारतीय दंड संहिता १६३ अन्वये मतमोजणी केद्रापासून १०० मीटरच्या आत पादचारीत क्षेत्र म्हणुन घोषीत केले असल्याची माहिती दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,457
मतमोजणी विधानसभा निवडणूक शैलेश हिंगे संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.