Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्याच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची वर्णी निश्चित, मंत्रीपदाचा फार्मूला ठरला… भाजप २१, सेना १२, राष्ट्रवादीला १० मंत्रीपदे
राजकारण

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची वर्णी निश्चित, मंत्रीपदाचा फार्मूला ठरला… भाजप २१, सेना १२, राष्ट्रवादीला १० मंत्रीपदे

दिल्लीतील बैठकीत होणार निर्णय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी | मुंबई

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा आता सुटल्यात जमा आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह करणारे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि सिडकोचे चेअरमन संजय शिरसाठ यांनी आग्रह धरूनही भाजपने त्यांना धूप घातली नाही. अखेर मुख्यमंत्रीपदाची मागणी शिंदे गटाला म्यान करावी लागली आहे. हे पद भाजपकडे जाणार हे निश्चित आहे. मात्र ते कोणाच्या गळ्यात जाईल हे स्पष्ट झालं नसलं तरी त्या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिली पसंती असल्याने फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं मानलं जातं.

फडणवीस दिल्लीला – विधानसभा निवडणुकीतील दिग्विजयानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटू शकतो.

पुन्हा दोन उपमुख्यमंत्रीपद – राज्यात पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्रिपदांचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपकडेच मुख्यमंत्री पद जाणार असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्त्वानं हिरवा कंदिल दिला आहे. त्यांच्या नावाला हो नाही करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील मान्यता दिली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्त्वानं मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही प्रयत्नशील – मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहावं यासाठी एकनाथ शिंदे यांचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी ते गेल्या ३६ तासांपासून वाटाघाटी करत आहेत. पण शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही. त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. शिवसेनेला १२ मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात काही महत्त्वाची खाती असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदं मिळतील. भाजप स्वत:कडे २१ मंत्रिपदं ठेवणार आहे.

महत्त्वाचे खाते मित्र पक्षांना – गृह, अर्थ, शहर विकास, महसूल ही महत्त्वाची खाती मित्रपक्षांना सोडण्यास भाजप सुरुवातीला तयार नव्हता. पण आता यातील काही खाती मित्रपक्षांना देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहेत. गृह आणि अर्थ खाती आपल्याकडेच असावीत असा भाजपचा आग्रह आहे. यासाठी सध्या वाटाघाटी सुरु आहेत.

दिल्लीत शिंदे फडणवीस पवार बैठकीला – अखेरच्या क्षणी मंत्रिपदांमध्ये, विभागांमध्ये बदल होऊ शकतो, असं सुत्रांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे, फडणवीस आणि पवार हजर असतील. यामध्ये मुख्यमंत्रिपदासह अन्य मंत्रिपदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांना मंत्रिमंडळात सन्मानजनक वाटा देण्यात येईल, असा शब्द भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून शिंदे, पवारांना देण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,999
अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.