Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणुकीतील गैरप्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार, शपथही नाकारली
राजकारण

निवडणुकीतील गैरप्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार, शपथही नाकारली

शपथ घ्यायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे, शरद पवारांवर सोपविला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार ०७ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई
राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांचा निषेध म्हणून निवडून आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घालत स्वतःही शपथ घेण्यास नकार दिला. या कृतीने देशभर निवडणूक आयोगाची निर्भत्सना होऊ लागली आहे. आज विरोधकांपैकी कोणीही शपथ घेतली नसल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील प्रभू आणि महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, निषेध म्हणून आज शपथ घेतली जाणार नाही. हा निकाल म्हणजे जनतेने दिलेले की आयोगाने दिलेले मँडेट आहे, याबाबत लोकांमध्ये संशय आहे. इतका मोठा विजय झाला, मात्र विजयाचा कुठेही जल्लोष नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मारकडवाडी मॉक पोल प्रकरण ही जनतेच्या मनातील शंका आहे. मात्र सरकार तेथील जनतेवर दबाव टाकत आहे, स्थानिक २० जणांना अटक केलीय. विशेष म्हणजे विजयी उमेदवारदेखील या विरोधात जनतेच्या सोबत आहेत. आम्ही जिंकलो असलो तरी आयोगाबाबत शंका आहे. त्यामुळे जनतेचा मान राखून आज शपथ घेतली जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
लोकशाही चिरडण्याचे काम आधी सुरू झाले होते, २०१४ नंतर संस्था संपवण्याचे काम सुरू झाले. मारकडवाडी अटकेचा दडपशाहीचा त्यांनी निषेध केला. मारकडवाडी येथील मतपत्रिकेवर मतदान घ्यायचा निर्णय घेतला, मात्र निवडणूक संपल्यावर आयोगाचे तिथे काय काम होते, असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय. लोकशाहीवर वरंवटा फिरवण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने व्यवस्थित नियोजन करून दिलेली व्यवस्था आम्ही उद्ध्वस्त करणार आहोत. राज्यातील जनतेने मनावर घेतले आणि राज्यात हे लोण पसरेल म्हणून सरकारकडून लोकशाही वाचवण्यासाठी दबाव आहे. आम्ही मारकडवाडी नागरिकांच्या पूर्ण पाठीशी असल्याचंही ते म्हणालेत.
विजय वडेट्टीवार यांनी राज्यात जो उत्साह हवा तो कुठेही नाही, राज्यात शोककळा पसरल्याची भावना व्यक्त केलीय. दाल मे कुछ काला नही, तो पुरी दाल काली है, असे ते म्हणालेत. आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी दबाव टाकला जात असल्याची टीका त्यांनी केलीय.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शपथ घ्यायची का नाही याचा निर्णय पवार आणि ठाकरेंच्या सोबतच्या चर्चेनंतर करण्यात येईल, असे स्पष्ट केलंय. मोदी सरकारमध्ये जवान आणि शेतकऱ्यांना मारले जात आहे. मतदानाचा अधिकार काढून घेतला जात आहे. मारकडवाडीने राज्यातील जनतेच्या मनातील खदखद बाहेर आणली. आम्ही निवडून आलेले आमदार आहोत. मात्र आज शपथ घेणार नाही आणि शपथ घ्यायची की नाही याचा निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरेंशी बोलून घेणार, असे त्यांनी स्पष्ट केलंय. सत्ताधाऱ्यांनी राज्याभिषेकासारखा शपथविधी सोहळा केलाय, त्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्याची टीकाही त्यांनी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 730
महाविकास आघाडी शपथविधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.