Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी-नाशिक मार्गावर धावणाऱ्या ई-बसबाबत रात्री घडली दुर्दैवी घटना, महिलेचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
अपघात

शिर्डी-नाशिक मार्गावर धावणाऱ्या ई-बसबाबत रात्री घडली दुर्दैवी घटना, महिलेचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

काही सेकंदात घडली घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/12/2024Updated:08/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, ०८ डिसेंबर – नाशिक

बस स्थानकात उभ्या असलेल्या ईबस चालकाने बस सुरू करताच क्षणार्धात बसने उसळी घेत समोरील लोखंडी बार तोडत बस थेट स्थानकाच्या भिंतीवर आदळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुन्हा दाखल – शनिवारी रात्री अपघाताची ही दुर्दैवी घटना मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात घडली असून यासंदर्भात बसचालका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

अशी आहेत नावे – अपघातात आंध्रप्रदेशची महिला बसखाली सापडून जागीच ठार झाली. अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (२३, रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून चौकशी खिडकीसमोर बसची माहिती घेण्यास उभे असलेले गोरक्ष मछिद्र गोसावी (५७, रा. पाथर्डीफाटा) हे या अपघातात जखमी झाले आहे.

अशी घडली घटना – शिर्डी येथून नाशिकला जाणारी ई बस (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) महामार्ग स्थानकात शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फलाटावर चौकशी कक्षासमोर बस चालक उमेश दत्तात्रय भाबड (३२, रा. वेहळगाव, नांदगाव) यांनी बस फलाटावर थांबविली. बसमधून प्रवाशी खाली उतरल्यानंतर ते लॉक सीट एंट्री करण्यासाठी बसखाली उतरले. काम आटोपून भाबड पुन्हा बसमध्ये चढले. त्यांनी बस सुरू करताच जोरदार आवाज झाला अन् काही क्षणातच बसने अचानक उसळी घेतली. काही सेकंदात समोरील लोखंडी बार तोडून बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर धडकली.

नेमकं काय घडलं – याच दरम्यान चौकशी कक्षाजवळच्या ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जुन (३०, रा. कोंडीकंडर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली नागर्जुन हिला बसची जोरदार धडक बसल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बस ची चौकशी करण्यासाठी चौकशी खिडकी समोर उभे असलेले गोरक्ष गोसावी जखमी झाले.

भिंत कोसळली – या अपघातात चौकशी कक्षाची एका बाजूची भिंत पूर्णतः कोसळली आहे. हा प्रकार पाहताच स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोसावी यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,511
अपघात बस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने देश व समाज समजलेले नेते होते.…

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.