Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाठलाग करताना आरोपीसह पोलीस कर्मचारी विहिरीत पडले, उपचारासाठी दोघांनाही रुग्णालयात केले दाखल
गुन्हेगारी

पाठलाग करताना आरोपीसह पोलीस कर्मचारी विहिरीत पडले, उपचारासाठी दोघांनाही रुग्णालयात केले दाखल

संगमनेरच्या सांगवी गावातील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०९ डिसेंबर – संगमनेर

सात वर्षांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा पाठलाग सुरू असताना रात्रीच्या वेळी अंधाराचा अंदाज न आल्याने पोलीस पथकातील एक पोलीस कर्मचारी व आरोपी विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी रात्री संगमनेर तालुक्यातील सांगवी गावामध्ये घडली.

काय होती घटना – याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादाच्या कारणावरून तालुक्यामध्ये २०१६ साली हाणामारी झाल्याची एक घटना घडली होती. या घटनेतील आरोपीने आपल्या मामा आणि मामीला जमिनीच्या वादातून बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सदर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार गुन्हेगाराचा पोलिसांना मिळाला माग – गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने या आरोपीने पलायन केले होते. घटना घडल्यापासून तो फरार होता. अधूनमधून तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी संगमनेरमध्ये यायचा. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू होता. मोबाईलच्या लोकेशन वरून पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागताच त्याला अटक करण्यासाठी एक पोलीस पथक रवाना झाले.

आरोपी आणि पोलीस पडले विहिरीत – हा आरोपी ज्या ठिकाणी थांबलेला होता. त्या ठिकाणी पोलीस पथकातील कर्मचारी पोहचले. आपल्याला पकडण्यासाठी पोलीस पथक आल्याची कुणकुण लागताच या आरोपीने पोलिसाला धक्का देऊन पलायन केले. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला. एका शेतातून आरोपी पुढे पळत होता तर पोलीस पथक मागून त्याचा पाठलाग करीत होते. हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळी सुरू होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने झाडाझुडपांमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मधे असलेल्या अंधारामुळे विहिरीचा अंदाज न आल्याने आरोपी व त्याच्या पाठोपाठ पोलीस पथकातील एक पोलीस कर्मचारी विहिरीत पडले.

उपचारासाठी रुग्णालयात – विहिरीत पडलेल्या आरोपीला पोहता येत असल्याने त्याने लगेचच विहिरीच्या कडेचा आसरा घेतला. मात्र पोलीस कर्मचाऱ्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांने आरडाओरडा सुरू केला. आवाजाच्या दिशेने धावलेल्या पोलिसांना आरोपी आणि पोलीस कर्मचारी विहिरीत पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने काही ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही विहिरीतून वर काढले. व दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिकाऱ्यांकडून दुजोरा – याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमने यांच्याशी संपर्क साधला असता, आपण रजेवर असून या घटनेची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला असून विहिरीत पडलेला पोलीस कर्मचारी व आरोपी शहरातील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,708
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.