Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने पळविणारी टोळी पकडली, नऊ गुन्ह्यांचा शोध; अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने पळविणारी टोळी पकडली, नऊ गुन्ह्यांचा शोध; अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी

समांतर तपास
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार ९ डिसेंबर – अहिल्यानगर

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये धूम स्टाईलने दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पळविण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. दागिने पळविणाऱ्या अशाच एका टोळीला पकडण्यात अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पथकाने टोळीतील चार जणांना अटक केली. तर दोघे अद्याप फरार आहेत. या टोळीकडून संगमनेरमधील आठ आणि लोणी मधील एका गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे आहेत आरोपी – पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मध्ये मयूर संजय ब्राह्मणे (वय २२, रा. चर्चजवळ, वेताळबाबा चौक, लोणी, ता. राहता जि. अहिल्यानगर), निखिल सुरेश भुजबळ (वय २०, रा. गिरीम, ता. दौंड, जि. पुणे, हल्ली रा. भाने वस्ती, हसनापूर रोड, लोणी, ता. राहता, जि. अहिल्यानगर), दीप भटू सातपुते (वय २२ रा. रणछोडजी सोसायटी, कतारग्राम सूरत, गुजरात, हल्ली रा. भाने वस्ती, हसनापूर रोड, लोणी, ता. राहता, जि. अहिल्यानगर) व अभिषेक बाळासाहेब जाधव (वय २२, रा. बाभळेश्वर, ता. राहता, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून संदीप पोपट कदम, (रा. मानोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) व बल्ली उर्फ बलीराम रामचंद्र यादव, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) अशी फरार आरोपींची नावे आहे.

एलसीबीला तपासाचे दिले होते आदेश – संगमनेरमध्ये सातत्याने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याच्या घटना घडत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला या गावांच्या समांतर तपास करत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. त्यामुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी यासाठी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस आमदार मनोज गोसावी, अमृत आढाव, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, रमिझराजा अत्तार, रोहित येमुल, सागर ससाने, जालिंदर माने, रवींद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांच्या पथकाला दागिने चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले.

पथक आरोपीपर्यंत पोहोचले – पथकाने घटनास्थळी भेट देऊन, आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथक मयूर संजय ब्राह्मणे यांच्यापर्यंत पोहोचले असता त्याने आपल्या सहकाऱ्यांसह दागिने पळविण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यासह अन्य आरोपींना अटक केली आहे तर दोघे अद्याप फरार आहे. आरोपींना संगमनेर पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे.

लोणी येथील सराफाला दागिने विकले – आरोपींनी संगमनेर मधील आठ आणि लोणी येथील एका अशा नऊ ठिकाणी पल्सर आणि युनिकॉर्न मोटरसायकलवरून संगमनेर शहर व लोणी येथे गुन्हे केल्याची कबुली दिली असून चोरीचे दागिने हे लोणी येथील सराफाला विकले असल्याचे सांगितले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,202
एलसीबी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.