Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संख्येने कमी असले तरी विरोधकांचा आवाज कमी होणार नाही – नवनियुक्त अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची ग्वाही
राजकारण

संख्येने कमी असले तरी विरोधकांचा आवाज कमी होणार नाही – नवनियुक्त अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची ग्वाही

विधानसभेच्या सर्व २८८ सदस्यांना समान संधी देण्याची ग्वाही
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 9, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार ०९ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई

भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. रविवारी नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. पण त्यानंतर विरोधकांकडून कोणीही अर्ज न भरल्याने नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली. ज्याची औपचारिक घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. यानंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेल्या नार्वेकरांनी सर्वांचे आभार मानत विरोधकांना महत्त्वाचे आश्वासन दिले. तसेच यापुढे आता कोणीही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार नाही, अशी विनंती नार्वेकरांकडून करण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी यासाठी अभिनंदन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव स्वीकारत नार्वेकरांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, सर्वांच्या सदिच्छा सोबत घेत मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारत आहे. आजच्या या विधानसभेतील चित्र सत्तारूढ पक्षाच्या बाजूने असले, महायुतीचे एकूण २३७ आमदार असले तरीही विधानसभेच्या सर्व २८८ सदस्यांना समान संधी देण्याची ग्वाही आज मी या सभागृहाला देतो.

यावेळी त्यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना उद्देशून म्हटले की, नाना आपली संख्या जरी कमी असली तरी विरोधकांचा आवाज कमी राहणार नाही, ही जबाबदारी माझी राहील,” असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. यावेळी नार्वेकर यांनी विरोधकांसाठी शायरी बोलून दाखवली. याबाबत ते म्हणाले की, विरोधी पक्ष किती महत्त्वाचा आहे, विरोधी पक्षाची बाजू जाणून घेणे, हे किती आवश्यक आहे याची कल्पना आहे, असे म्हणत त्यांनी चार ओळीतून ते व्यक्त करत म्हटले की, “तुम पर कोई जबरदस्ती नहीं की तुम मेरी सारी बाते मानो… मुझे सिर्फ इतना पता है की, मेरे लिए तुम बहुत जरुरी हो… अब आगे तुम जानो…” असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला आहे.

तर, सभागृहातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभेल, अशी आशा देखील यावेळी नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 391
महाविकास आघाडी राहुल नार्वेकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.