Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाच लाखांवरील ठेवी परत मिळवण्यासाठी लढा उभारणार, अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा रविवारी मेळावा
सामाजिक

पाच लाखांवरील ठेवी परत मिळवण्यासाठी लढा उभारणार, अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा रविवारी मेळावा

डी. एम. कुलकर्णी यांनी दिली माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, १० डिसेंबर – अहिल्यानगर 

अवसायानात निघालेल्या नगर अर्बन सहकारी बँकेमध्ये अडकलेल्या पाच लाखांपेक्षा वरील ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांची संघटित शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने बँकेच्या ठेवीदारांचा रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता शहरातील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बँक बचाव कृती समितीचे सदस्य डी. एम. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अर्बन बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांच्या ठेव रकमा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी कोणाही ठेवीदाराकडून बँक बचाव कृती समितीला याची माहिती दिली नाही. या ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी समितीने मोठा संघर्ष केला, लढा उभारला, याचाही ठेवीदारांना विसर पडला आहे. त्यामुळे समितीचे सदस्य व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

मध्यंतरी बँकेचे अवसायक गायकवाड यांच्याकडील दुःखद घटनेमुळे ते जवळपास दोन-अडीच महिने बँकेत नियमित येत नव्हते. त्यामुळे बँकेच्या कर्जदारांकडील वसुलीवर मोठा परिणाम होऊन वसुली थंडावली. परिणामी ठेवीदारांना देण्यासाठी सध्या बँकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. काही ठेवीदारांनी त्यांच्या ठेव रकमा मिळवण्यासाठी अवसायकांची भेट घेऊन अकारण अकांडतांडव केला. अर्वाच्य भाषा वापरून वाद घातला. त्यामुळे अवसायक अवमानित झाले.

या ठेवीदारांनी बँक बचाव कृती समितीच्या न्यायालयीन लढ्यासाठी निधीची व्यवस्था करणारे राजेंद्र चोपडा व राजेंद्र गांधी यांच्यावरही अयोग्य आरोप करून अवमानकारक भाषा वापरली. यामुळे ठेवीदारांसाठी काम न करण्याच्या मनस्थितीत ते आहेत. विधानसभा निवडणुका व अन्य कारणामुळे पोलीस दलाकडून बँकेच्या घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष झाले. पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रियाही थंडावली आहे.

ठेवीदारांनी समितीकडे पाठ फिरवल्याने ठेवीदारांच्या दृष्टीने हालचाली थंडावल्या आहेत. यामुळे पाच लाखांवरील ठेवी मिळवण्यासाठी ठेवीदारांच्या संघटित शक्तीची गरज आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी हा मेळावा होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 381
डी. एम. कुलकर्णी नगर अर्बन बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.