Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शंभरावर अधिक काम प्रलंबित, कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या माजी नगराध्यक्ष-नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा नगरपालिकेवर मोर्चा; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
आंदोलन

शंभरावर अधिक काम प्रलंबित, कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या माजी नगराध्यक्ष-नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा नगरपालिकेवर मोर्चा; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2024Updated:11/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ११ डिसेंबर
तत्कालीन मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालिकेसाठी दिलेल्या निधीतून शंभरावर कामे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. रखडलेल्या या कामांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ही काम तातडीने पूर्ण केली जावीत यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा नेत प्रशासकांना मागण्यांचे निवेदन दिले.

यांनी दिले निवेदन – मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, किशोर पवार, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, सिद्राम दिद्दी, योगेश जाजू, प्रमोद कडलग, अफजल शेख, एकनाथ श्रीपाद, प्रमिला अभंग, शीतल भुसाळ, मिलिंद औटी, हर्षल राहणे, मोहसीन शेख, अंबादास आडेप, जीवन पंचारिया, रिजवान मंत्री, अमित गुंजाळ, कमलेश उनवणे, गौरव डोंगरे, अंबादास आडेप आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, स्वच्छ व सुंदर संगमनेरमध्ये सध्या कचरा व्यवस्थापन होत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळून देऊन सुद्धा मागील तीन वर्षापासून प्रशासनाने अनेक रस्त्यांची कामे केलेली नाहीत. रस्त्यांना खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी गटार तुंबले आहेत. त्याचप्रमाणे शहर व उपनगरातील अनेक पथदिवे बंद आहेत. गुन्हेगारीच्या काही घटना घडत आहेत. शहर व उपनगरांमध्ये डास निर्मूलनासाठी फवारणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर घंटागाडी नेमून दिलेल्या वेळेस प्रभागात जात नसल्याने अनेक नागरिक रस्त्यांच्या कडेला कचरा टाकत आहेत. शहर, उपनगरात कचऱ्यासह मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले असून या सर्वांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून म्हाळुंगी पुलाचे काम… संगमनेर शहरातील अनेक विकास कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा निधी मिळवला आहे. म्हाळुंगी नदीवरील पूल तातडीने व्हावा, यासाठी बाळासाहेब थोरात यांनी निधी मिळवला. मात्र फक्त राजकारण करण्यासाठी प्रशासनाने काम थांबविले आणि आता सुद्धा हे काम संथगतीने सुरू केले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून तातडीने हा पूल पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

प्रलंबित कामासाठी सध्याचे सरकार व प्रशासन जबाबदार…
लोकनेते तत्कालीन माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून शहरातील विकास कामांकरता सातत्याने मोठा निधी मिळाला. शहरात अनेक कामे मार्गी लागली. सततच्या स्वच्छतेमुळे संगमनेर नगर परिषदेला राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले. मात्र मागील तीन वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक असल्याने सर्व कामे ठप्प झाली आहे. विकास कामांसाठी मोठा निधी मिळूनसुद्धा कामे रखडवली गेली आहेत. हे अत्यंत चुकीचे असून या सर्व प्रलंबित कामांसाठी सध्याचे सरकार व प्रशासन जबाबदार आहे. तरी नागरिकांच्या सुविधांसाठी तातडीने सर्व कामे सुरू करावीत – दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्ष.

नगरपालिका प्रशासन दखल घेईल…
शहरातील विविध समस्या संदर्भात निवेदन मिळाले आहे. निवेदनातील मुद्द्यांच्या आधारे समस्यांची शहरात प्रत्यक्षात पाहणी करून पडताळणी केली जाईल. नागरिकांना त्रास होणार नाही. आंदोलने, मोर्चे होणार नाही याची नगरपालिका प्रशासन दखल घेईल. – रामदास कोकरे, मुख्याधिकारी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,407
दुर्गाताई तांबे रामदास कोकरे संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.