Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नानांची पत्राद्वारे खर्गेंकडे मागणी, कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा!
राजकारण

विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नानांची पत्राद्वारे खर्गेंकडे मागणी, कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा!

नव्या प्रदेशाध्यक्षांची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपुरात येणार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 14, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार १४ डिसेंबर 

मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. ‘माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १६ जागा मिळाल्याने काँग्रेसमध्ये आता या पराभवाची कारणमीमांसा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

प्रदेश कमिटी बरखास्त करा!… मी मागील ४ वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे मला आता सर्व जबाबदारीतून मुक्त करावे, प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करावा, अशी विनंतीही पटोले यांनी आपल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन आपल्या राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना तूर्त पदावर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी पत्राद्वारे पदमुक्त करण्याची मागणी केल्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पराभवाची जबाबदारी पटोलेंचीच… प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय घेतले होते. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी त्यांच्यावरच येईल, असे वक्तव्य माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात रंगली आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपुरात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

पटोलेंवर अनेक नेते नाराज… नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज असून, त्यांना हटवण्याची मागणी सुरू आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील जागावाटपात काही महत्त्वाच्या जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर जागावाटपाच्या बैठकांची जबाबदारी नाना पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 762
काँग्रेस नाना पटोले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

By अनंत पांगारकरJuly 30, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संगमनेर तालुकास्तरीय विशेष शिबिर व कार्यक्रम…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.