Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगमनेर शहर व तालुक्यात नववर्षाच्या प्रारंभापासून महाआरोग्य अभियान…
आरोग्य

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगमनेर शहर व तालुक्यात नववर्षाच्या प्रारंभापासून महाआरोग्य अभियान…

एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने २५ पेक्षा अधिक आजारांसाठी एकाच छताखाली तपासणी व सल्ला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १५ डिसेंबर

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी १ जानेवारी २०२५ पासून संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व गावांमध्ये महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी असणाऱ्या या शिबिराअंतर्गत विविध आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. या शिबिरात आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आणि अल्पदरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिली.

या आरोग्यशिबिराबाबत अधिक माहिती देताना डॉ. तांबे म्हणाले, एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्यावतीने राज्यातील २७ जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील गोरगरीब, ऊसतोड कामगार, आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांना मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

हे वर्ष सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने एसएमबीटी हॉस्पिटल, आयएमए, निमा, संगमनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन संगमनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, शहरातील व ग्रामीण भागातील अनेक नामांकित डॉक्टर्स व हॉस्पिटल यांच्या संयुक्त माध्यमातून १ जानेवारी २०२५ पासून संगमनेर शहर व तालुक्यात या महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जन्मजात हृदयविकार, हृदयविकार, कर्करोग, मूत्रविकार, किडनी व डायलिसीस, जनरल शस्रक्रिया, अस्थिरोग, सांधेदुखी, पोटदुखी, हाडांचे आजार, स्त्रियांचे आजार, पोटविकार शस्रक्रिया, दंत तपासणी, नेत्ररोग तपासणी व उपचार होणार आहे.

याचबरोबर आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जाणार असून ज्यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार करणे शक्य नाही त्यांना नंदी हिल येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचार केले जाणार आहेत. हे महाआरोग्य शिबिर तालुक्यात विविध ठिकाणी होणार आहे.

या शिबिरातून सर्व तरुण, नागरिक, शेतकरी व महिला या सर्वांनी स्वतःची आरोग्य तपासणी व रोगनिदान करून घ्यावे, असे आवाहन एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व यशोधन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलला पेशंटला येण्या–जाण्याची मोफत सुविधा… 

संगमनेर तालुक्यात होत असलेल्या महाआरोग्य शिबिरातून ज्या व्यक्तींवर उपचार करणे गरजेचे आहे. अशा सर्व व्यक्तींना एसएमबीटी हॉस्पिटलला जाण्या-येण्याची मोफत सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे या शिबिरातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार असल्याने सर्वांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 736
आरोग्य शिबिर एसएमबीटी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.