Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री फडणवीसांना हवेत मंत्री धनंजय मुंडे विरोधात पुरावे… विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांना हवेत मंत्री धनंजय मुंडे विरोधात पुरावे… विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. पण काल या दोघांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड CID ला शरण यावं, हा योगायोग म्हणावा की पोलिसांच्या हाताला न लागता, तो स्वत:च पोलीस स्टेशनला जावा. हे घडवलेलं नाट्य आहे का
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/12/2024Updated:31/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कथित आरोपी वाल्मिक कराड याचे पाठीराखे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे मिळाल्याशिवाय त्यांना मंत्रिमंडळातून दूर केलं जाणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासंबधीचा खुलासा करत मुंडे यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही. मी अगोदरपासून सांगत आलो आहे की, कोणाही विरोधात पुरावा असेल तर द्या. आम्हीही पुरावे शोधत आहोत. पण दुसऱ्या कोणाकडे पुरावे असतील तर, त्यांनीही द्यावेत. मात्र ज्याच्या विरोधात पुरावा असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

याशिवाय, “माझ्या मते संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचे आहे. पण काही लोकांना राजकारण महत्त्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभो. त्यांच्या राजकारणाने फार काही फायदा होईल असे मला वाटत नाही. त्यामुळे मला कोणत्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्या वक्तव्याचे समर्थन अथवा त्याचा विरोध करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, काल (३० डिसेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्यावेळी राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी यावरून शंका उपस्थित केली. त्यानुसार, काल (30 डिसेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. पण काल या दोघांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड CID ला शरण यावं, हा योगायोग म्हणावा की पोलिसांच्या हाताला न लागता, तो स्वत:च पोलीस स्टेशनला जावा. हे घडवलेलं नाट्य आहे का, अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असल्याचे सांगत जाधव यांनी महायुतीवर निशाणा साधला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 834
देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे भास्कर जाधव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.