Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मदतनिसाने मंडळाधिकाऱ्यासाठी मागितली दहा हजाराची लाच, नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाच लुचपतची कारवाई
गुन्हेगारी

मदतनिसाने मंडळाधिकाऱ्यासाठी मागितली दहा हजाराची लाच, नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाच लुचपतची कारवाई

हरकत अर्ज प्रकरणामध्ये केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडलाधिकारी कार्यालय, बेलापूर येथे खासगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी केरु वडितके यांनी मंडलिक यांच्यासाठी दहा हजारांची लाचेची मागणी केली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 1, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
बुधवार दि. १ जानेवारी २०२५

अहिल्यानगर – महसूल खाते आणि भ्रष्टाचार असे समीकरण बनलेले आहे. सामान्य माणसांचे दैनंदिन काम महसूल खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडे पडते. त्यांच्याशिवाय खरेदी-विक्री, कर्जाच्या नोंदी, वारस नोंदी, विविध दाखले, प्रतिज्ञापत्र असे कुठलेही काम होत नाही. त्यामुळे सामान्य माणसांना लुबाडण्याचा आपल्याला जणू काही अधिकार मिळाला असल्याच्या अविर्भावात महसूल खात्याचे अधिकारी कर्मचारी वागतात. आतापर्यंत अनेकांना अटक झाल्यानंतर देखील त्यातून इतर कर्मचारी धडा घेताना दिसत नाहीत. अशाच प्रकारचा एक गुन्हा श्रीरामपुरात दाखल झाला.

बेलापुरातील मंडलाधिकारी कार्यालयातील मदतनीस असलेल्या मांडवे येथील शहाजी केरू वडितके याने दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने त्याला अटक केली आहेत. मंगळवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत एका तक्रारदाराने मौजे तलाठी कार्यालय गळनिंब (ता. श्रीरामपूर) येथील खरेदी खताची नोंद सातबाऱ्यावर न घेण्याकरता हरकत अर्ज दाखल केला. तक्रारदाराच्या हरकत अर्जाची सुनावणी मंडलाधिकारी बी. के. मंडलिक यांच्याकडे सुरू होती. हरकत अर्ज प्रकरणामध्ये केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडलाधिकारी कार्यालय, बेलापूर येथे खासगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी केरु वडितके यांनी मंडलिक यांच्यासाठी दहा हजारांची लाचेची मागणी केली.

याबाबतची तक्रार १८ सप्टेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली होती. त्यात लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी शहाजी केरू वडितके याने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या हरकत अर्ज प्रकरणातील केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मंडलाधिकारी बी. के. मंडलिक यांच्यासाठी दहा हजारांची रुपयांची लाचेची मागणी केली. ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्र शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, उपअधीक्षक अजित त्रिपुटे, अंमलदार सचिन सुद्रूक, अंमलदार गजानन गायकवाड, उमेश मोरे, हारुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,662
लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.