Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात, मृत आणि जखमींची नावे समोर; नाशिकच्या द्वारका पुलावर नेमकं काय घडलं?… मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर
अपघात

टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात, मृत आणि जखमींची नावे समोर; नाशिकच्या द्वारका पुलावर नेमकं काय घडलं?… मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर

यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल तेरा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातातील मृत आणि जखमी निफाड तालुक्यातील धारणगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला.

दरम्यान अपघातातील मृत आणि जखमींची काही नावे समोर आली आहे…

मृतांची नावे 

१)अतुल संतोष मंडलिक

२) संतोष मंडलिक

३) यश खरात

४) दर्शन घरटे

५) चेतन पवार

जखमींची नावे 

१) सार्थक (लकी) सोनवणे

२) प्रेम मोरे

३) राहुल साबळे

४) विद्यानंद कांबळे

५) समीर गवई

६) अरमान खान

७) अनुज घरटे

८) साई काळे

९) मकरंद आहेर

१०) कृष्णा भगत

११) शुभम डंगरे

१२) अभिषेक

१३) लोकेश

असा घडला अपघात – द्वारका उड्डाणपुलावर या मुलांना घेऊन जात असलेला टेम्पो एका ट्रकला जोरात धडकला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअप ट्रकच्या काचा फोडून मागच्या भागात शिरल्या. या लोखंडी सळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्या. त्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला. यामुळे सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघांचा सोमवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर….

लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाणपुलावरुन जात होता. या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा कापड वा तत्सम कुठलेही निशाण लावलेले नव्हते. त्यामुळे टेम्पोचालकाला ट्रकमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे दिसले नाही. त्यामुळे टेम्पो वेगाने जाऊन ट्रकच्या मागच्या बाजुला आदळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जोरदार धडक झाल्याने ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये घुसल्या. या लोखंडी सळ्या मागच्या बाजूला असणाऱ्या मुलांच्या शरीरात शिरल्या आणि अनेकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण सिडको, अंबड भागातील कामगार असून एकमेकांचे नातेवाईक होते. या घटनेमुळे सिडको आणि अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,277
अपघात नाशिक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

By Annant Ppangarkar24/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क…

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.