Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » यासाठी छात्रभारती करणार राज्यभर ठिय्या आंदोलन
आंदोलन

यासाठी छात्रभारती करणार राज्यभर ठिय्या आंदोलन

योजनेतील सहभागी बेरोजगार युवक गरीब घरातील आहे. हाताला काम नाही म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्फत संधी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे या तरुणांना आपण काय काम देणार यांचा सरकारने कुठलाही खुलासा केला नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील यात सहभागी असलेल्या बेरोजगार तरुणांना अद्यापही या योजनेचे मानधन मिळालेले नाही. या मानधना संदर्भात प्रांताधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शास्त्र भारतीय संघटनेच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. सहभागी बेरोजगार तरुणांना मानधन न मिळाल्यास छात्र भारती संघटनेच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवल उपलब्धता शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे.
या योजनेत बारावी उत्तीर्ण, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना प्रशिक्षणाअंती अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने मिळणार होते.
ऑगस्टमध्ये निवडणुकी अगोदर सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना सुरू केली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर सरकारने या योजनेत सहभागी असलेल्या तरुणांकडे थेट दुर्लक्ष केले आहे. योजनेच्या माध्यमातून राज्यभरात दीड लाख बेरोजगार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील राज्यातील लाखो तरुणांना अजूनही या योजनेचे विद्या वेतन मिळू शकलेले नाही. विद्या वेतन मिळेल की नाही याची देखील शाश्वती राहिलेली नाही. सरकारने निवडणुकीच्या मतांसाठी प्रलोभाने दाखवून तरुणांची मते मिळविण्यासाठी हा डाव आखल्याचा आरोप छात्र भारतीचे अनिकेत घुले यांनी केला आहे.
योजनेतील सहभागी बेरोजगार युवक गरीब घरातील आहे. हाताला काम नाही म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्फत संधी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे या तरुणांना आपण काय काम देणार यांचा सरकारने कुठलाही खुलासा केला नाही . सरकारला छात्रभारती संघटनेच्यावतीने विनंती आहे की तात्काळ आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेत काम केलेल्या तरुणाच्या खात्यावर त्याच्या कष्टाचे पैसे द्यावेत. अन्यथा छात्रभारतीच्या वतीने महाराष्ट्रभर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. – अनिकेत घुले, राज्य कार्याध्यक्ष छात्र भारती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 556
अनिकेत घुले आंदोलन छात्र भारती निवेदन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.