Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंत्री विखे पाटील यांचे भाष्य! जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव…, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती…; जिल्हा बँकेचा कारभार…
राजकारण

मंत्री विखे पाटील यांचे भाष्य! जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव…, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती…; जिल्हा बँकेचा कारभार…

जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 19, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर –

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा विभाजनासंदर्भात जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजना संदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. एवढेच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव सरकार समोर नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही. आपण महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही.

जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक आणि भरती प्रक्रियेचे समर्थन – जिल्हा सहकारी बँकेच्या कारभार पारदर्शक असून, देशपातळीवर बँकेचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. बँकेची भरती योग्य पद्धतीने सुरू असून, काही लोक बँकेची बदनामी का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत जिल्हा बँकेच्या कारभार आणि भरती प्रक्रियेचे समर्थन त्यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत. दिल्लीच्या आपच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगावा लागला, त्यांनी इतरांवर आरोप करू नयेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

खासदार लंके यांच्यावर टीका – जलजीवन मिशन योजनेच्या कामांत भ्रष्टाचार असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री विखे म्हणाले, या कामात काही त्रुटी, उणिवा असू शकतात. यामुळे या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. पाणीपुरवठा विभागाचे मंत्री म्हणून गुलाबराव पाटील या विभागाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, काही लोकांना कामच राहिले नाही. यामुळे ते जनतेमध्ये राहण्यासाठी ओढून-ताणून आरोप करत आहेत. जनतेने त्यांना नाकारलेले असून, त्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,503
जिल्हा विभाजन राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

By अनंत पांगारकरJuly 30, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संगमनेर तालुकास्तरीय विशेष शिबिर व कार्यक्रम…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.