Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज ठाकरेंच्या तिरकस सवालाने राष्ट्रवादी हैराण, राज यांच्या बदलत्या भूमिकेचा महाराष्ट्र साक्षी
राजकारण

राज ठाकरेंच्या तिरकस सवालाने राष्ट्रवादी हैराण, राज यांच्या बदलत्या भूमिकेचा महाराष्ट्र साक्षी

फक्त १.५५ टक्के मतं मिळालेल्या मनसेवर पक्ष चिन्ह रेल्वे इंजिन जातंय की काय? अशी परिस्थिती उद्भवली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
विशेष प्रतिनिधी / मुंबई
राज्य विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांचे चार आमदार निवडून येण्याची पात्रता नव्हती त्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागा कशा मिळाल्या या राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाने राष्ट्रवादी काँग्रेस हैराण झाली आहे. राज यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने तिरकस सवाल करत महाराष्ट्राने राज ठाकरे यांची बदलणारी भूमिका पाहिली आहे असं त्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विचारलं आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिलं. विधानसभेत महायुतीत येणार की नाही, अशी गोंधळलेली स्थ‍िती मनसेची झाली होती. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला. पण मनसे कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलताना दिसली. अशा गोंधळलेल्या अवस्थेमुळेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेवर कधी विश्वास बसला नाही, असं परांजपे म्हणाले.
भाजपा नेते आणि मंत्री आश‍िष शेलार म्हणाले की, “राज ठाकरे हे जो नरेट‍िव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो अर्धवट माहितीच्या आधारे आहे. राज ठाकरे हे जे सांगू पाहत आहेत, त्याचं उत्तर एकच आहे की, आम्ही राष्ट्रनिर्माण करताना राष्ट्रीय पक्ष म्हणून कधीही तडजोड केली नाही.
एक भारत श्रेष्ठ भारत, पोखरण, एनआरसी, सीएए यासारख्या विषयावर भाजपानं कधीही तडजोड केली नाही. मात्र, वेळ, काळ आण‍ि राजकीय परिस्थिती पाहून सरकार चालविताना जे तत्कालिक घडते, त्याचा राज ठाकरे हे एक अर्थ लावून निरुपण करु पाहत आहेत. ते जे नरेट‍िव्ह सेट करु पाहत आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाही. फक्त १.५५ टक्के मतं मिळालेल्या मनसेवर पक्ष चिन्ह रेल्वे इंजिन जातंय की काय? अशी परिस्थिती उद्भवली आहे.
“महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल, आपले कार्यकर्ते, पदाधिकारी कसे टिकतील यावर चिंतन करावं,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी राज ठाकरे यांना लगावला. “राज ठाकरे हे एक नरेट‍िव्ह सेट करु पाहत आहेत. मात्र, तो जनतेला कधी पटणार नाही,” अशी बोचरी प्रतिक्रिया आश‍िष शेलार यांनी दिली.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 564
आनंद परांजपे आशिष शेलार राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.