Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज ठाकरे यांना आमदार खताळांनी एक्सवर केले संगमनेरमध्ये आमंत्रित
राजकारण

राज ठाकरे यांना आमदार खताळांनी एक्सवर केले संगमनेरमध्ये आमंत्रित

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच ठाकरे यांनी निकालाबाबत व्यक्त केलेली शंका संगमनेरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांना थोरात यांचा पराभव अनपेक्षित असाच होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/02/2025Updated:01/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. १ –

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मुंबईतील कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विश्लेषण करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान थोरात यांचा पराभव करून संगमनेरमधून निवडून आलेल्या आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना या संदर्भात आपल्या एक्स अकाउंटवर उत्तर देताना संगमनेरमध्ये आमंत्रित केले आहे.

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच ठाकरे यांनी निकालाबाबत व्यक्त केलेली शंका संगमनेरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांना थोरात यांचा पराभव अनपेक्षित असाच होता. मात्र थोरात यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघात केलेली कामे जनतेसमोर असताना देखील थोरात यांनी चाळीस वर्षात काय केले असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक मैदानात उतरलेल्या खताळ यांनी थोरात यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत निवडणुकीत थोरात यांचा धक्कादायक पराभव करत विजय मिळवला.

दरम्यान याच विषयावरून दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी थेट थोरात यांचे नाव घेत त्यांच्या पराभवाबद्दल शंका उपस्थित केले. आणि केवळ मीच नव्हे तर सारा महाराष्ट्र प्रश्न उपस्थित करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर या मतदारसंघातून निवडून आलेले अमोल खताळ यांनी शनिवारी आपल्या एकस अकाउंटवर एक पोस्ट टाकत राज ठाकरे यांना बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी संगमनेरला आमंत्रित करत असल्याचे म्हटले आहे.

https://x.com/amolkhatalpatil/status/1885536216373748025?t=O-Ke-b9adjn5dJhJUkxY1A&s=19

या पोस्टमध्ये खताळ यांनी राज ठाकरे यांना उद्देशून म्हटले आहे की, साहेब, संगमनेरच्या जनतेने पाणीटंचाई, बेरोजगारी, अपूर्ण विकास व जनतेकडे दुर्लक्ष यामुळेच चाळीस वर्षापासून निवडून दिलेल्या बाळासाहेब थोरात यांना नाकारलं आहे. ४० वर्ष आमदार, १७ वर्ष मंत्री असून पण तालुक्यात साधी एमआयडीसी नाही, शेतीला पाणी नाही मग जनतेने मत का द्यावी? राज साहेब मुंबईच्या बाहेर या संगमनेर पहा संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते मतांच्या माध्यमातून जनतेने परिवर्तन करून दाखवले हे सत्य तुम्हाला समजेल! बाकी कोणाच्या तरी सांगण्यावरून पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी संगमनेरमध्ये आमंत्रित करतोय, असं म्हटलं आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,930
अमोल खताळ बाळासाहेब थोरात राज ठाकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.