Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सांस्कृतिक उपक्रम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त अविष्कार – मुख्याधिकारी रामदास कोकरे
शिक्षण

सांस्कृतिक उपक्रम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त अविष्कार – मुख्याधिकारी रामदास कोकरे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ०५ फेब्रुवारी – 

सांस्कृतिक उपक्रम हे व्यक्तिमत्व विकासाचे सर्वोत्तम साधन असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार असल्याचे प्रतिपादन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदाचा कला महोत्सव दिगंबर गणेश सराफ विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कला महोत्सवात नाटिका, नाट्यछटा, रंगभरण, भेटकार्ड आदी विविध स्पर्धांमधून दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला गेला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे, बाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद गाडगीळ यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी बोलताना कोकरे म्हणाले, कोणत्याही कलेची आवड सुसंस्कृत नागरिक तयार करण्यात मोलाचे योगदान देत असते. सर्वांच्या सहकार्यातून राज्यातील एक परिपूर्ण असे नाट्यगृह लवकरच कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या रुपाने संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणार आहे. 

डॉ. दळवी यांनी संगमनेर नाट्य परिषद शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी कटिबद्ध असून नजीकच्या काळात आणखी विविध उपक्रम आयोजित करेल. विविध कला प्रकारातील कलाकार अथवा सांस्कृतिक क्षेत्राची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने सभासद होण्यासाठी आपणास असे संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नृत्य, नाट्यसंगीत यांच्या निर्मितीचे मूळ विद्यार्थ्यांना समजावून सांगत डॉ. गाडगीळ म्हणाले, संगमनेर नाट्य परिषदेच्या सहकार्यातून लवकरच काही नवीन उपक्रम आयोजित करण्यासाठी संस्था सहकार्याचा हात पुढे करेल. 

स्पर्धेमध्ये संगमनेरमधील काशेश्वर विद्यालय, ज्ञानमाता विद्यालय, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, बी. जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, पी. जे. आंबरे पाटील कन्या विद्यालय, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, जाजू इंग्लिश मीडियम स्कूल, शिवशंकर विद्यालय, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय अशा विविध शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. 

सांस्कृतिक विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून उपक्रमशील शिक्षक या सन्मानाने गौरविण्यात आले. भारती चौधर, योगिता पाटील, प्राजक्ता कासार, शैलजा गाडे यांचा तर उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून कारभारी वाकचौरे यांचा गौरव करण्यात आला. 

शशांक गंधे, राजाभाऊ भांडगे, नंदा बागुल, राजू आत्तार, राधा चव्हाण, योगिता पाटील, डॉ. संजीवनी ब्राह्मणे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर अविनाश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी स्पर्धा प्रमुख सुभाष कानडे, धनंजय ढोले, दत्ता बटवाल, प्रशांत पेडणेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, कोषाध्यक्ष मोहसीन शेख, प्रमुख कार्यवाह विशाल कदम, विठ्ठल मुंगसे, द्वारकानाथ जाधव, संजय गुंजाळ, सुनील मंडलिक यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 385
नाट्य परिषद मुकुंद गाडगीळ रामदास कोकरे संजयकुमार दळवी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर शहरातील सह्याद्री कॉलेज शेजारी, ऑरेंज कॉर्नर…

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.