Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे उद्घाटन, सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – राज्यपाल हरिभाऊ बागडे
शेती व सहकार

शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे उद्घाटन, सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – राज्यपाल हरिभाऊ बागडे

चांगल्या कामगिरीच्या आधारे आदर्श निर्माण करा.... पालकमंत्री विखे पाटील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, रविवार दि. ०९ – 

सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते‌. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार काशीनाथ दाते, सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित हेत्तीयाराची, सेवानिवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतूरे व पतसंस्था चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल बागडे म्हणाले, भारतात १९०४ मध्ये सहकार कायदा झाला. त्याआधी महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे रूजली आहेत. राज्य सहकारी बँकेची सुरुवात पतसंस्थेपासून झाली आहे. पतसंस्थेच्या चळवळीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मन लावून काम करण्याची गरज आहे‌. सहकार क्षेत्रातील चुका लपविण्यापेक्षा त्या सुधारण्यावर भर द्यायला हवा. आजही लोकांचा सहकारावर विश्वास आहे.

त्यामुळे सहकार वर्षात काही नवीन उपक्रम हाती घेऊन अडचणीतील असलेल्या संस्थांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. सहकारात व्यापक दृष्टीकोन ठेवून आपण केले पाहिजे. ज्यांच्या ठेवींचे व्याज कमी त्या ठेवींच्या परतीची हमी असते. त्यामुळे अधिक ठेवी, अधिक व्याज ही स्पर्धा पतसंस्थांनी निर्माण करू नये, असे बागडे म्हणाले.

चांगल्या कामगिरीच्या आधारे आदर्श निर्माण करा….

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यातील अनेक सहकारी संस्था उत्कृष्ट कार्य करत आहेत. अन्य संस्थांनीही चांगली कामगिरी करून देशासमोर आदर्श निर्माण करावा. केंद्र शासन सहकार चळवळीला उत्तेजन देत आहे. शेतमाल साठवणुकीचे गोदाम सहकारी संस्थांनी उभे केले पाहिजेत. ठेवीदारांच्या ठेवीना संरक्षण मिळाले तरच ठेवीदार सहकारी संस्थांत पैसे गुंतवतील‌. ठेवीदारांच्या ठेवींचे रक्षण करणे सहकारी संस्थांचे कर्तव्य आहे. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे.

सहकारी संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध…

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्रात १६ हजारपेक्षा अधिक पतसंस्था कार्यरत असून या चळवळीत सुमारे ३० कोटी लोक सहभागी आहेत. सहकाराला उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी ठोस नियमावली आखण्याची गरज आहे. कर्ज वाटप करतांना पूर्ण पारदर्शकता असली पाहिजे. शासनाचे धोरण विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम करण्याचे आहे. सहकारी संस्थांंनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे.

श्रीकृष्ण वाडेकर, उदय जोशी, रणजित हेत्तीयाराची यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यामागील भूमिका प्रास्ताविकात काका कोयटे यांनी मांडली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 648
आंतरराष्ट्रीय सहकार परिषद बाबासाहेब पाटील राधाकृष्ण विखे हरिभाऊ बागडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

संगमनेर तालुक्यात १०२ कोटींच्या विकासकामांचा धडाका; उद्या पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.