Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाथरूममध्ये अंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा काढला व्हिडिओ, आरोपी अकबर सय्यद याच्या विरोधात ॲट्रॉसिटी व पोक्सोनुसार गुन्हा दाखल; संगमनेर तालुक्यातील घटना
गुन्हेगारी

बाथरूममध्ये अंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा काढला व्हिडिओ, आरोपी अकबर सय्यद याच्या विरोधात ॲट्रॉसिटी व पोक्सोनुसार गुन्हा दाखल; संगमनेर तालुक्यातील घटना

दरम्यान या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून तपासी यंत्रणेने सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2025Updated:11/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ११ फेब्रुवारी –

घरासमोर तात्पुरता आडोसा करून उभारण्यात आलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकबर युनूस सय्यद (रा. चिंचोली गुरव, संगमनेर) या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दहावीमध्ये शिकत असलेली सोळा वर्षीय वयाची पीडित तरुणी घरासमोर बॅनरच्या कागदाचा आडोसा करून तयार करण्यात आलेल्या बाथरूममध्ये सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होती.

वरतून छत नसलेल्या बाथरूममध्ये पीडित तरुणी आंघोळ करत असताना शेजारी गवताच्या ढिगावर उभा राहून आरोपीने आपल्या जवळील मोबाईलच्या सहाय्याने बाथरूमच्या उघड्या छतातून पीडित तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढत असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने आरडाओरडा केल्याने आरोपीने तेथून पळ काढला.

मुलीचा आवाज ऐकून पीडित तरुणीची आई तेथे आली. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे नातेवाईकांनी आरोपीच्या घराबाहेर जात यासंदर्भात विचारणा केली असता आरोपीने व्हिडिओ संबंधात माहिती देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे सोमवारी रात्री पीडित तरुणीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात येत आरोपी अकबर युनूस सय्यद याच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलिसांसह पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यासंदर्भात स्वतः तपास करत आहे.

दरम्यान या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून तपासी यंत्रणेने सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,380
अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा पोक्सो संगमनेर तालुका पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.