Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी कटीबद्ध राहणार-आ. खताळ
धार्मिक

खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी कटीबद्ध राहणार-आ. खताळ

खंडोबा देवगड देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ब वर्ग दर्जात समावेश करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2025Updated:14/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर प्रतिनिधी – 

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवगड देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ब वर्ग दर्जात समावेश करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू तसेच या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध राहू, असा विश्वास संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा महाराज यात्रोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे आणि अश्व प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

देवगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने खताळ यांचा सत्कार करण्यात आला. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रथमच खताळ यांच्या हस्ते खंडोबा महाराज मल्हार मार्तंड यांचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली. तसेच येळकोट येळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट असा जयजयकार करत तळी सुद्धा भरण्यात आली.

संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवस्थान यात्रा उत्सव निमित्ताने आयोजित अश्व प्रदर्शन स्पर्धेत विजेत्या अश्व स्पर्धकांना आमदार खताळ यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी देवस्थानच्या ठिकाणी भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवातील शेतकऱ्यांच्या स्टॉलला त्यांनी भेट दिली.

भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे, उपाध्यक्ष पांडुरंग गडाख, सचिव मोठ्याभाऊ बढे, खजिनदार चंद्रशेखर गडाख, काशिनाथ पावसे, उत्तम जाधव, गोरक्षनाथ पावसे, यादव पावसे, सुरेश पावसे, कामगार पोलीस पाटील मथाजी पावसे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश दवंगे, केशव दवंगे, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, बाबासाहेब पावसे, दादासाहेब गडाख, सोमनाथ दवंगे, मच्छिंद्र गडाख, प्रकाश पावसे, गणेश शिंदे, ओम दवंगे, विनोद पावसे, निलेश पावसे, भारत गोफणे, संजय येरमळ, रोशन येरमल यांच्यासह हिवरगाव पावसा येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

देवगड खंडोबा देवस्थानचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून क वर्ग दर्जात समावेश करण्यात आलेला आहे येथून पुढील काळात या देवस्थानचा पर्यटन विकासात समावेश करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. या देवस्थानाच्या विकासासाठी येथून पुढे जी काही मदत लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध राहील. अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 855
अमोल खताळ देवगड खंडोबा देवस्थान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.