Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोकातील सहा आरोपींबद्दल संगमनेरच्या न्यायालयाने घेतला हा निर्णय, आरोपींची रवानगी…
न्यायालय

मोकातील सहा आरोपींबद्दल संगमनेरच्या न्यायालयाने घेतला हा निर्णय, आरोपींची रवानगी…

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास करत या गुन्ह्यांमध्ये नऊ आरोपी निष्पन्न केले होते. तर सात जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. गुन्ह्यातील सामील असलेले दोघे अद्यापही फरार आहेत. अटकेतील काहींची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2025Updated:14/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १४ फेब्रुवारी –
संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील सहा आरोपींना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी गुरुवार आणि शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत.
नोव्हेंबर महिन्यात साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी दुकानासमोर हवेत गोळीबार करत दुकानात प्रवेश करत दुकानातील कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील भर दिवसा दरोडेखोरांनी अख्खे दुकानच लुटून नेल्याने परिसरात मोठी खळबळ माजली होती.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास करत या गुन्ह्यांमध्ये नऊ आरोपी निष्पन्न केले होते. तर सात जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. गुन्ह्यात सामील असलेले दोघे अद्यापही फरार आहेत. तर अटक करण्यात आलेल्या पैकी काहींची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली होती.
दरम्यान पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलिसांच्या तपासामध्ये संघटितपणे दरोडा टाकणाऱ्या या आरोपींनी तब्बल २१ पेक्षा अधिक गुन्हे संघटितपणे केल्याचे आढळून आल्याने या आरोपींवर मोका अंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम) कारवाई करण्यात आली.
मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींपैकी अक्षय बाळासाहेब वावरे (वय २४ वर्ष, रा. माळेगाव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती, जि. पुणे), स्वप्निल किशोर येळे (वय २२ वर्ष, रा. माळेगाव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती, जि. पुणे), मनोज उर्फ दयावान बाळू उर्फ बाळासाहेब साठे (वय २५ वर्ष, रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळू देवकर (वय २२ वर्ष, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) व आकाश तुकाराम दंडवते (वय २८ वर्ष, रा. मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) या पाच जणांना मोका कोर्टाचे जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर हजर करून १५ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.
सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सरकार पक्षाच्या वतीने आरोपींनी केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपींना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोकातील आरोपी न्यायालयाच्या परिसरात आला आणि पोलिसांनी जेरबंद केला…
दरम्यान या आरोपींना गुरुवारी पोलिसांनी रिमांडसाठी न्यायालयात आणले असता या आरोपींचा मोकातील फरार असलेला सहकारी त्यांना भेटण्यासाठी न्यायालयात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात आलेल्या या आरोपीला न्यायालयाच्या परिसरातून लगेचच ताब्यात घेत अटक केली. शुक्रवारी या आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी आरोपीच्या कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने त्याला देखील २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नव्या पोलीस उपाधीक्षकांच्या काळातील पहिलीच मोठी कारवाई…
संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांची काही दिवसांपूर्वीच संगमनेरला बदली झाली. त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच मोका अंतर्गत कारवाई असून आतापर्यंत नऊ पैकी सहा जण पोलिसांच्या हाती लागले आहे. तर एक आरोपी जामीनावर बाहेर असून अन्य दोघे अद्यापही फरार आहे. या सर्वांचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,309
कुणाल सोनवणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय मोका साकुर दरोडा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar10/09/20260

annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.