Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता मुख्य निवडणूक आयुक्तांची जागा घेतील ज्ञानेश कुमार, नव्या कायद्यांतर्गत नियुक्त पहिले मुख्य निवडणूक आयुक्त
यश / निवड / पुरस्कार

आता मुख्य निवडणूक आयुक्तांची जागा घेतील ज्ञानेश कुमार, नव्या कायद्यांतर्गत नियुक्त पहिले मुख्य निवडणूक आयुक्त

२०१८ ते २०२१ मध्ये ज्ञानेश कुमार यांनी ३७० कलम हटवण्यामध्ये आणि जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेत महत्त्वाचं योगदान दिलं होतं. नरेंद्र मोदी यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्मितीत देखील त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/02/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी – 

नव्या कायद्याअंतर्गत ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

निवृत्तीनंतर त्यांना १४ मार्च २०२४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून घेण्यात आलं होतं. ज्ञानेश कुमार यांनी १४ मार्चला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मार्च २०२३ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नेमण्यात आले होते.

ज्ञानेश कुमार आता तीन सदस्यीय निवडणूक आयोगाचे नेतृत्व करणार आहेत. आयोगातील अन्य सदस्यांमध्ये उत्तराखंड कॅडरचे अधिकारी सुखबीर सिंह संधू यांचा समावेश आहे.

२०१८ ते २०२१ मध्ये ज्ञानेश कुमार यांनी ३७० कलम हटवण्यामध्ये आणि जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेत महत्त्वाचं योगदान दिलं होतं. नरेंद्र मोदी यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्मितीत देखील त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. याशिवाय ज्ञानेश कुमार यांनी मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा २०२३ निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं होतं. सहकार क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी हे योगदान देण्यात आलं होतं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 654
ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026

रविवार विशेष लेख ज्ञानेशाच्या नावानं भाजपचं चांगभलं!

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.