Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही! आमदार अमोल खताळ असं का म्हणाले…
बैठक

कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही! आमदार अमोल खताळ असं का म्हणाले…

जलसंपदामंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आणि हा पठार भाग सुजलाम सुफलाम करायचा आहे. या भागातील लोकांना पाणी आले आणि ते पाणी जर उचलता आले नाही तर आम्ही दुर्दैवी ठरू.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. १८ फेब्रुवारी – 

वेळेत आपल्या कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या, माझ्या मतदारसंघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देत येथून पुढे जर विजेचे रोहित्र जळाले तर ग्रामस्थांनी वर्गणी काढायची नाही तसेच तीन दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी वीज रोहित्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

पठार भागातील साकुर उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या साकुर, मांडवे, कर्जुले पठार, डोळसणे, घारगाव, खांबे या महावितरणच्या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांची आढावा बैठक खताळ यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधातील तक्रारींचा पाढाच आमदार खताळ यांच्यासमोर मांडला. 

यावेळी बाबासाहेब कुटे, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, लहानु खेमनर, रऊप शेख, गुलाब भोसले, नितीन आहेर, संदीप खिलारी, अमृता कोळपकर, प्रियंका जाधव यांच्यासह महावितरणचे संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक इंगळे, उपकार्यकारी अभियंता प्रेमराज पाटील, साकुर चे उपअभियंता राजेश झा, घारगावचे उपअभियंता दीपक थोरात यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात आमदार खताळ यांच्याकडे तक्रारी केल्या. पठार भागातील साकुर व परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही. वीज येथे आणि जाते सातत्याने येथे विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अवघड बनले आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. अशा तक्रारी ऐकल्यानंतर आमदार खताळ संतप्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले.

शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी पाणी नव्हतं आता इकडून तिकडून पाणी आलं तर वीज मिळत नाही. शेतातील पिके जळत आहे. विजेबाबत शेतकऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तर सौजन्याने वागत नाही. या मागे काय झाले ते सोडून द्या, परंतु आता येथून पुढे कोणत्याही कामात हलगर्जीपणा केलेला मी खपवून घेणार नाही. जर व्यवस्थित काम करावयाचे नसेल तर बदली करून घ्या. 

महावितरण कंपनीच ठेकेदार चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यामुळे आपण या कंपनीमध्ये जी ठेकेदारी चालू आहे ती सर्वप्रथम बंद करा. येथून पुढे महावितरणवर ठेकेदाराचे नव्हे तर अधिकाऱ्यांचे वर्चस्व राहिले पाहिजे. पुढील कालावधीमध्ये जलसंपदामंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आणि हा पठार भाग सुजलाम सुफलाम करायचा आहे. या भागातील लोकांना पाणी आले आणि ते पाणी जर उचलता आले नाही तर आम्ही दुर्दैवी ठरू.

मतदारसंघांत अधिकाऱ्यांना जर कोणी आमचा कार्यकर्ता त्रास देत असेल तर मी अधिकाऱ्यांबरोबर राहील. परंतु जर का सर्वसामान्य ग्राहकांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी त्रास देत असतील मी शेतकऱ्यांबरोबर आणि वीज ग्राहकांबरोबर राहील. जीर्ण झालेल्या विजेच्या तारा बदलल्या नसल्यामुळे त्या खाली लोंबकळत आहे. याबाबतचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. आपण ऊर्जा मंत्र्यांना भेटून त्यावर उपाययोजना करू. संगमनेरच्या विकासासाठी इतर मतदार संघांपेक्षा निश्चितच निधी जास्त दिला जाईल, असा विश्वास आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी दिला असल्याचे खताळ म्हणाले. प्रास्ताविक रऊप शेख यांनी केले तर आभार ॲड. अमित धुळगंड यांनी मानले.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,875
अमोल खताळ आढावा बैठक महावितरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.