Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवजयंतीच्या निमित्ताने ‘जय छत्रपती शिवाजी जय भारत’ पदयात्रेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन, शिवछत्रपतींच्या जयघोषात अहिल्यानगरी दुमदुमली
धार्मिक

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘जय छत्रपती शिवाजी जय भारत’ पदयात्रेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन, शिवछत्रपतींच्या जयघोषात अहिल्यानगरी दुमदुमली

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. १९-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगरतर्फे शहरात माळीवाडा बसस्टँड शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ‘जय छत्रपती शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हलगी-संबळ वादन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जीवंत देखावे आणि पारंपरिक खेळांच्या चित्तथरारक सादरीकरणाने शिवकाळ उभा केला.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ केला. आमदार संग्राम जगताप आणि श्री. सालीमठ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिव प्रतिमेला अभिषेक करून पूजन करण्यात आले. यावेळी जिजाऊ वंदना करण्यात आली आणि शिवाजन्माचा पाळणा सादर करण्यात आला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक अमोल भारती, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष रामचंद्र दरे आदी उपस्थित होते.

पदयात्रेत विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या पथकांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जीवंत देखावे सादर केले. पर्यावरण संरक्षण, वाहतुकीचे नियम, अवयवदानाचे संदेशही पदयात्रेच्या माध्यमातून देण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशात पदयात्रेत सहभागी झाले.

जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे, क्रीडा मंडळांचे लेझिम आणि ढोल पथकांचे सादरीकरण पदयात्रेचे विशेष आकर्षण होते. वारीचा देखावाही यावेळी सादर करण्यात आला. पदयात्रेत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी पोलिस बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विशाल गणपती, आशा टॉकीज , मराठा मंदिर सायकल मार्ट , मेन कापड बाजार, टेली खुंटी चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, नील क्रांती चौकमार्गे पुढे जाईल आणि रेसिडेन्सीयल कॉलेज येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 464
salimuth shivjayanti
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.