Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपयशावर मात करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासा – व्याख्याते प्रा. गणेश शिंदे
धार्मिक

अपयशावर मात करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासा – व्याख्याते प्रा. गणेश शिंदे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी नाटकामध्ये संगमनेर तालुक्यातील १४७ कलाकारांनी सहभाग घेतला होता. या सर्व कलाकारांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. १९ फेब्रुवारी – 

लोकशाहीची मूल्य रुजवणारा आदर्श राजा, उत्तम प्रशासन, दूरदृष्टीचे नेतृत्व, शूरता आणि उत्तम व्यवस्थापन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र हे प्रत्येकासाठी यशाचे पैलू निर्माण करून देणारे असून अपयशावर मात करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे.

मालपाणी लॉन्स येथे एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने राजे शिवछत्रपती यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.

व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे सचिन आहेर, गणेश मादास, तेजस गोरडे, शैलेश आहेर, ऋषी काकड, साहिल गुंजाळ, सोहम पलोड, आदित्य चकोर, मयूर कांडेकर, यश कांडेकर, प्रसाद गुंजाळ, स्वरूप राहणे, ओम शिंदे, ओम जाधव, राजआयर्न काकड आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, इतिहासातील उत्तम प्रशासक आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे जग पाहते. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो आपल्या सर्वांसाठी अभिमान आहे. हा प्रेरणादायी इतिहास तुम्हाला जीवन जगायला शिकवेल. महाराजांचे साहस, शूरता, दूरदृष्टी याबरोबर व्यवस्थापन हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. ज्या-ज्या वेळेस जीवनामध्ये अपयश येईल त्यावेळेस तुम्हाला महाराजांचे चरित्र प्रेरणा देईल.

अफजलखानाच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसात महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला. जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी निवडले, हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधला. तर बाजीप्रभू, तानाजी, येसाजी कंक, बहिर्जी नाईक असे अनेक मावळे घेऊन स्वराज्य निर्माण त्यांनी केले. महाराजांनी निर्माण केलेले गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. किंबहुना जगातील लोक हे गड किल्ले पाहण्यासाठी आले पाहिजे. कमबॅक करण्यासाठी शिवचरित्र प्रत्येकाला प्रोत्साहन देत असून तुलना करणे बंद केल्याने माणसाचे दुःख कमी होईल असे ते म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक नागरिकाचे प्रेरणास्थान आहे. महाराजांचा इतिहास हा प्रत्येकाला स्फूर्ती देतो. सर्व धर्म समभाव आणि मानवतेचा विचार घेऊन पुढे जाण्यासाठी सर्वांनी काम करावे

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रधर्म हा समानता शिकवतो. सर्वांना पुढे घेऊन जाणारा हा महाराष्ट्र धर्म असून हा जपण्यासाठी प्रत्येक तरुणाने कटिबद्ध राहावे.

प्रास्ताविक सचिन अहिर यांनी केले. संगमनेर तालुक्यातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवपुत्र संभाजी नाटकातील १४७ कलाकारांचा सत्कार… लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी नाटकामध्ये संगमनेर तालुक्यातील १४७ कलाकारांनी सहभाग घेतला होता. या सर्व कलाकारांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 676
गणेश शिंदे जयश्री थोरात बाळासाहेब थोरात व्याख्यान शिवजयंती उत्सव सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.