Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत, जिल्हा न्यायालयाने ठोठावली दोन वर्षांची शिक्षा! मंत्रीपदासह आमदारकीवर टांगती तलवार
न्यायालय

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत, जिल्हा न्यायालयाने ठोठावली दोन वर्षांची शिक्षा! मंत्रीपदासह आमदारकीवर टांगती तलवार

गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणावर त्यांना शिक्षा सुनावली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/02/2025Updated:20/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक, दि. २० फेब्रुवारी 

कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोपात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल २९ वर्षांनी या खटल्यचा निकाल लागला आहे.

१९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदासह आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. तर या खटल्यातील अन्य दोन आरोपींना न्यायालयाने कोणत्याही स्वरूपाची शिक्षा ठोठावली नाही. खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये सदनिकांच्या घोटाळ्या संबंधाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. १९९५ कोकाटे आमदार होते तर दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.

गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणावर त्यांना शिक्षा सुनावली आहे. यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात माणिकराव कोकाटे वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, इथेही त्यांना दिलासा मिळाला नाही तर माणिकराव कोकाटे यांनी आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

असं आहे नेमकं प्रकरण….

कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री दिघोळ यांनी कोकाटे यांच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचे उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसऱ्या घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली होती. त्यांना शासनाच्या माध्यमातून त्या सदनिका मिळाल्या. विशेष म्हणजे कोकाटे बंधूंनी किंवा त्यांना मिळालेल्या सदनिकाच घेतल्या नाही तर उर्वरित दोघांना मिळालेली घरी म्हणून लाटली होती. ही बाब अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ भास्कर पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संबंधात तक्रार दाखल केली होती. तर माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही यासंबंधी एका याचिकेद्वारे कोकाटे यांच्यावर कागदपत्रात फेरफार व फसवणुकीचा आरोप केला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,054
तुकाराम दिघोळे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय माणिकराव कोकाटे शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.