महसूल मंडळाच्या फेररचनेनंतर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय – आमदार अमोल खताळ
तहसिल कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावाची कागदपत्र समाज माध्यमामधून समोर आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला याचे गांभीर्य सुध्दा त्यांनी वरीष्ठांच्या लक्षात आणून दिले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव संगमनेर तहसिल कार्यालयाने वरिष्ठांना सादर केला होता.
अप्पर तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव पाठविण्यापुर्वी महसूल मंडळाची फेररचना होणे अत्यंत गरजेचे होते. मात्र याबाबत संगमनेर तहसिल कार्यालयाने लोकप्रतिनीधीशी कोणतीही चर्चा न करता व संबधित गावातील लोकांच्या भावना विचारात न घेता प्रस्ताव सादर केल्याने संभ्रम निर्माण झाल्याची बाब खताळ यांनी अप्पर महसूल सचिवांच्या निदर्शनास आणून दिली.
तहसिल कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावाची कागदपत्र समाज माध्यमामधून समोर आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला याचे गांभीर्य सुध्दा त्यांनी वरीष्ठांच्या लक्षात आणून दिले.
महसूल मंडळाची फेररचना झाल्यानंतरच तालुक्यातील जनतेसाठी सोयीचे ठिकाण निश्चित करून अप्पर तहसिल कार्यालयाची स्थापना करण्याच्या मागणीला महसूल मंत्री बावनकुळे, पालकमंत्री विखे पाटील आणि अप्पर सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद देवून याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे.
याबाबत कोण काय आरोप करतो याला मी महत्व देत नाही. सामान्य जनता माझ्या पाठीशी असल्याने त्यांच्या भावनांचा आदर करूनच
निर्णय होईल याची खात्री आहे. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याच्या भूमिकेचे खताळ यांनी स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत.
