Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय… वडील-भावाकडे ‘जातवैधता’ असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही
न्यायालय

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय… वडील-भावाकडे ‘जातवैधता’ असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही

न्यायालयाने समितीला खडेबोलही सुनावले. एका महिन्याच्या कालावधीत प्रमाणपत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. अनंता रामटेके यांनी तर समितीच्यावतीने ॲड. जे.वाय. घुरडे यांनी बाजू मांडली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नागपूर : जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने याचिकाकर्ता मुलाच्या वडिलांना जातवैधता प्रमाणपत्र दिले, त्याच्या भावाला आणि बहिणीला देखील दिले. मात्र याचिकाकर्ता मुलाने समितीकडे अर्ज केल्यावर कागदपत्रे पुरेशी नसल्याचे कारण सांगून अर्ज नाकारण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीच्या या कृतीला बेकादेशीर ठरवत वडील, भाऊ-बहिणीकडे जातवैधता असताना समितीने इतर कागदपत्रे तपासण्याची गरजच नव्हती, असे निरीक्षण नोंदवले आणि समितीचा आदेश रद्द केला.

तसेच एका महिन्यात याचिकाकर्त्याला जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही मुख्य न्या. आलोक आराध्ये आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने समितीला दिले. ऋषी बळवंत दडमल या विद्यार्थ्याने नागपूरच्या जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ‘माना’ जनजाती समूहाचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्ज केला होता. समितीने ९ जानेवारी २०२४ रोजी याचिकाकर्ता ऋषीचा अर्ज फेटाळला. यानंतर ऋषीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

ऋषीचे वडील बळवंत नारायण दडमल यांना २२ जानेवारी २००७ रोजी जातवैधता प्रमाणपत्र दिले गेले होते. ऋषीचा भाऊ शिव तसेच बहीण कविता हिलाही समितीने १५ फेब्रुवारी २०२० रोजी जातवैधता दिले. मात्र ऋषीचा अर्ज नाकारला.

न्यायालयाने समितीला खडेबोलही सुनावले. एका महिन्याच्या कालावधीत प्रमाणपत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. अनंता रामटेके यांनी तर समितीच्यावतीने ॲड. जे.वाय. घुरडे यांनी बाजू मांडली असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 999
जात वैधता प्रमाणपत्र नागपूर खंडपीठ निर्णय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.