Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आर्थिक गैरव्यवहार करत राजकीय प्रतिष्ठित भाऊसाहेब कुटेने वाट लावलेल्या दूधगंगेला सावरण्यासाठी नव्या संचालकांची टीम मैदानात, संस्थेची निवडणूक बिनविरोध; यांचा आहे समावेश
शेती व सहकार

आर्थिक गैरव्यवहार करत राजकीय प्रतिष्ठित भाऊसाहेब कुटेने वाट लावलेल्या दूधगंगेला सावरण्यासाठी नव्या संचालकांची टीम मैदानात, संस्थेची निवडणूक बिनविरोध; यांचा आहे समावेश

यातील मुख्य आरोपी असलेला भाऊसाहेब कुटे आणि व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हे दोघे अद्यापही तुरुंगात असून अन्य काही आरोपींना न्यायालयाने, उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने ते जामीनावर बाहेर आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2025Updated:09/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ८ मार्च – प्रतिनिधी
राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या आणि वर्षानुवर्ष अध्यक्ष राहिलेल्या, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब कुटे याने आर्थिक गैरव्यवहार करत वाट लावलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेला गैरव्यवहाराच्या दृष्टचक्रातून सावरण्यासाठी आता नव्या संचालकांची टीम मैदानात उतरली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाचे निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
संगमनेरच्या सहकारातील अग्रगण्य असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत चेअरमन भाऊसाहेब कुटे याने संस्थेतील काही जणांना हाताशी धरत मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. तब्बल ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चेअरमन भाऊसाहेब कुटे, संस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह तब्बल २१ जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लेखा परीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे.
यातील मुख्य आरोपी असलेला भाऊसाहेब कुटे आणि व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हे दोघे अद्यापही तुरुंगात असून अन्य काही आरोपींना न्यायालयाने, उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने ते जामीनावर बाहेर आहे. मोठ्या आर्थिक गैरव्यवहारानंतर अनेक ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी झगडत आहे.
अशातच दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. तर १६ मार्चला प्रत्यक्ष निवडणूक होणार होती. मात्र तत्पूर्वीच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग प्रतिनिधीसाठी कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने ही जागा रिक्त आहे. या एकमेव जागेचा अपवाद वगळता उर्वरित १६ जागांवर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक एक जागा वगळता बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी या संदर्भात माहिती दिली.
नव्या संचालक मंडळात सर्व संचालक नवीन असल्याने आता ते संस्थेला सावरण्यासाठी नेमके काय प्रयत्न करतात, तसेच संस्थेतील गैरव्यवहारा संदर्भात नेमके काय पावले टाकतात, हे येत्या काही दिवसात समोर येईल.

असे आहे बिनविरोध झालेले नवे संचालक मंडळ…
सर्वसाधारण प्रतिनिधी म्हणून उत्तमराव कृष्णराव गुंजाळ, प्रभाकर पांडुरंग राहणे, लक्ष्मण नाना जोंधळे, अशोक सुखदेव गुंजाळ, भाऊसाहेब सावित्रा राऊत, रामनाथ बाळाजी कुटे, सुभाष सखाराम कुटे, खंडू बाबाजी सातपुते, विलास जगन्नाथ सातपुते, उत्तम गणपत पवार, अरुण रामचंद्र सातपुते, भाऊसाहेब सोमनाथ अरगडे
महिला राखीव प्रतिनिधी – मंदा रंगनाथ माने व संगीता दत्तू सातपुते
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – कैलास रामभाऊ घोडेकर
भटक्या जाती / जमाती / वि.मा.प्र. प्रतिनिधी – अण्णासाहेब रामनाथ गोफणे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 12,859
दूधगंगा पतसंस्था निवडणूक संतोष कोरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.