Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नासिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यात अपघात, महिलेचा मृत्यू तर पतीसह मुलगा जखमी; ठेकेदाराचा हलगर्जीपणा ठरतोय जीवघेणा
अपघात

नासिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यात अपघात, महिलेचा मृत्यू तर पतीसह मुलगा जखमी; ठेकेदाराचा हलगर्जीपणा ठरतोय जीवघेणा

प्राजक्ता गिरीश गिरमे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, वाहन चालवणार्‍या गिरीश गिरमे यांच्यासह पाठीमागील आसनावर बसलेला त्याचा १३ वर्षीय मुलगा वेदांत गंभीर जखमी झाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2025Updated:11/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या कारची त्याच लेनवरुन येणार्‍या आयशर टेम्पोशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्राजक्ता गिरीश गिरमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचे पती आणि मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर डोळासणे महामार्ग पोलिसांनी टोल कर्मचार्‍यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि ९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डोळासणे शिवारातील बांबळे वस्तीजवळ ही घटना घडली. सध्या सिन्नर ते खेड या नाशिक-पुणे महामार्ग कॉक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. साकूर फाट्यापासून पुण्याच्या दिशेने एकाच लेनवरुन दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली आहे.

रविवारी दुपारी गिरीश गिरमे (वय ३५) हे त्यांची पत्नी प्राजक्ता (वय ३०) व मुलगा वेदांत (वय १३ सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) हे सर्व मारुती सियाझ (क्र. एम.एच.१२ एल.पी. ५५५६) मधून नाशिकहून पुण्याकडे जात होते. डोळासणे शिवारात नाशिक लेनवर कॉक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने ही लेन पुण्याकडून येणार्‍या रस्त्याला जोडण्यात आली आहे.

गिरीश गिरमे यांनी डोळासण्याजवळ वळणरस्ता घेत काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी वाहनासमोर असलेल्या मालट्रकला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्याचवेळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या आयशर कंपनीच्या टेम्पोची (क्र. एच.आर.५५ ए.एन.६६४४) त्यांच्या कारला समोरासमोर धडक दिली. वाहनाचा वेग अधिक असल्याने हा अपघात होताच भरधाव वेगात दोन वाहनांची एकमेकांशी टक्कर झाल्यानंतर कारचा अक्षरशः चेंदा होवून ती रस्ता दुभाजकावर फेकली गेली.

या अपघातात वाहनांच्या धडकेने मोठा आवाज झाला. आसपासच्या नागरिकांनी आणि वाहनचालकांनी मदतीसाठी धाव घेतली. या अपघाताची माहिती डोळासणे महामार्ग पोलिसांना देण्यात आली. हिवरगाव पावसा टोलनाक्याला अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरु केले.

या भीषण अपघातात चालकाशेजारील सीटवर बसलेल्या प्राजक्ता गिरीश गिरमे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, वाहन चालवणार्‍या गिरीश गिरमे यांच्यासह पाठीमागील आसनावर बसलेला त्याचा १३ वर्षीय मुलगा वेदांत गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेतून जखमींना संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, मयत प्राजक्ता गिरमे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

या घटनेत एका महिलेचा नाहक बळी गेल्याने परिसरातील नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत करत आहे. नाशिक पुणे महामार्गावर वाढणाऱ्या अपघातामुळे निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराचा हाच हलगर्जीपणा गिरमे कुटुंबाच्या अपघाताला कारणीभूत ठरला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,642
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.