Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात छात्र भारतीचा निषेध मोर्चा… मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : आमदार कपिल पाटील
आंदोलन

संगमनेरात छात्र भारतीचा निषेध मोर्चा… मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : आमदार कपिल पाटील

घोषणाबाजी करीत हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. रंजना गवांदे, हिरालाल पगडाल, डॉ. अजित नवले, उत्कर्षा रुपवते यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १६ मार्च – प्रतिनिधी

छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार कपिल पाटील यांनी दिला आहे.

मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारती संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील छात्र भारतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयावर संगमनेरमध्ये मोर्चा काढला होता.

शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी संगमनेर नगर परिषदेत आले होते त्यावेळी मारहाणीची घटना घडली. मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची तक्रार देखील अद्यापपर्यंत पोलिसांनी नोंदवलेली नाही. तसेच मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे मारहाण करणाऱ्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी छात्र भारती संघटनेच्यावतीने भास्करराव दुर्वे स्मारक भावनापासून मोर्चा काढण्यात आला. ‌

घोषणाबाजी करीत हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. रंजना गवांदे, हिरालाल पगडाल, डॉ. अजित नवले, उत्कर्षा रुपवते यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कपिल पाटील म्हणाले, या जिल्ह्याला अहिल्यानगरचे नाव देण्यात आलेले आहे. अहिल्याबाईंच्या नावाने असलेल्या या जिल्ह्यामध्ये बीडसारखे वातावरण होऊ पाहत आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याची प्रतिष्ठा, परंपरा राखली पाहिजे. महाराष्ट्र हा फुले, आंबेडकरांचा आहे. फुले आंबेडकरांनी आखून दिलेली समतेची, एकतेची, लक्ष्मणरेषा नितेश राणे सारखे मंत्री ओलांडत असेल व अशा मंत्र्यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनिकेत घुले सारख्या कार्यकर्त्याला मारहाण होत असेल तर हा अक्षम्य गुन्हा आहे. पोलिसांनी गुन्हेगाराला त्वरित ताब्यात घेत गुन्हा दाखल केला नाही तर मोठा मोर्चा काढावा लागेल. दोन दिवस वाट पाहू अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रंजना गवांदे, डॉ. अजित नवले, दत्ता ढगे, उत्कर्षा रूपवते आदींनी आपल्या भाषणातून या मारहाणीचा निषेध करत मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,821
छात्र भारती मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.