Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोठी बातमी! शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता वाढली!
न्यायालय

मोठी बातमी! शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता वाढली!

फिर्यादी इंद्रजित सावंत यांची बाजू वकील असीम सरोदे यांनी मांडली, तर सरकारी वकील विवेक शुक्ल यांनीही प्रभावी युक्तिवाद केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कोल्हापूर, दि. १८ मार्च –

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयामुळे कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, त्याला कधीही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाची सुनावणी १७ मार्च रोजी पूर्ण झाली होती, तर निकाल १८ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. कोल्हापूर सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांची बाजू मान्य करत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जाला नकार दिला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यासोबतच, त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या घटनेनंतर कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्याने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला आहे. आता त्याला अटक होण्याची शक्यता बळावली आहे.

१७ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत कोरटकरच्या जामिनावर जोरदार युक्तिवाद झाला. फिर्यादी इंद्रजित सावंत यांची बाजू वकील असीम सरोदे यांनी मांडली, तर सरकारी वकील विवेक शुक्ल यांनीही प्रभावी युक्तिवाद केला. “स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. गुन्हा दाखल होताच कोरटकर ‘तो माझा आवाज नाही’ म्हणत फरार झाला,” असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

दुसरीकडे, आरोपी प्रशांत कोरटकरची बाजू वकील सौरभ घाग यांनी मांडली होती. तरीही न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 722
इंद्रजीत सावंत प्रशांत कोरटकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.