Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात कायद्याचे राज्य राहिले नसून अराजक… विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका
राजकारण

राज्यात कायद्याचे राज्य राहिले नसून अराजक… विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

युती सरकारचा प्रवास "बाबरीकडून कबरीकडे" गेला आहे, असा टोला लगावला. "या कबरीच्या नादात सरकारची कधी कबर खणली जाईल, हे त्यांना कळणारही नाही," असे ते म्हणाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. २५ मार्च – विशेष प्रतिनिधी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “राज्यात कायद्याचे राज्य राहिले नसून अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला.

दानवे म्हणाले, “हे सरकार कोत्या मनोवृत्तीने चालवले जात आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०२४ मध्ये राज्यात ७ लाख ८२ हजार ९६० गुन्हे नोंदवले गेले आहेत. अमरावती विभागात दंगलीचे ५६४ गुन्हे घडले आहेत, नागपूरमध्ये ८८ हत्या झाल्या आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या १६६ घटना घडल्या आहेत, आणि पुण्यात ५०६ गुन्हे घडले आहेत.

तुरुंगातील कैद्यांची क्षमता २७ हजार ११४ असताना ४३ हजार कैदी तुरुंगात ठेवले आहेत. राज्यात वर्षभरात जनतेची ५१ हजार कोटींची आर्थिक फसवणूक झाली आहे.” सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणावरही दानवे यांनी चिंता व्यक्त केली. “सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सायबर सेल अधिक प्रभावी करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

दानवे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा संदर्भ देत सरकारवर टीका केली. “छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता,” असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले.

या प्रस्तावावर बोलताना दानवे यांनी युती सरकारचा प्रवास “बाबरीकडून कबरीकडे” गेला आहे, असा टोला लगावला. “या कबरीच्या नादात सरकारची कधी कबर खणली जाईल, हे त्यांना कळणारही नाही,” असे ते म्हणाले. “डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार असूनही राज्यात गोंधळाची परिस्थिती का आहे?” असा सवालही त्यांनी केला. दानवेंनी विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 522
अंबादास दानवे टीका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.