Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये श्रीराम कथेचे आयोजन, १ ते ९ एप्रिल दरम्यान भाविक श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी
धार्मिक

संगमनेरमध्ये श्रीराम कथेचे आयोजन, १ ते ९ एप्रिल दरम्यान भाविक श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी

राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून संगमनेरकरांना श्रीराम कथा श्रवण करण्याचे सौभाग्य मिळणार आहे. या कथेदरम्यानच राधाकृष्णजी महाराज यांच्या रसाळ व गोड वाणीतून भजनाचा देखील आनंद लुटता येणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2025Updated:26/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी 

परमपूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत संगमनेरच्या मालपाणी लॉन्सवर भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम कथा भाविक श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या माध्यमातून संगमनेर शहर लवकरच एका भव्य धार्मिक कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहे.

१ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत दररोज दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून संगमनेरकरांना श्रीराम कथा श्रवण करण्याचे सौभाग्य मिळणार आहे. या कथेदरम्यानच राधाकृष्णजी महाराज यांच्या रसाळ व गोड वाणीतून भजनाचा देखील आनंद लुटता येणार आहे.

श्रीराम कथा श्रवणाच्या माध्यमातून श्रोत्यांना जीवनातील जगण्याचे सार समजणार असून यातील छोट्या मोठ्या घटनांमधून आपल्याला आयुष्य जगण्याची दिशा मिळणार आहे. श्रीराम कथा ही साक्षात भक्ती-ज्ञान-वैराग्याचे, विद्वत्तेचे आणि मर्यादेचे स्त्रोत आहे. नऊ दिवस चालणारा हा उत्सव सर्वांना संत दर्शन, हर्षोल्लास, समागम व आनंदाच्या एक अलौकिक संगमाकडे घेऊन जाणारा ठरणार आहे.

तत्पूर्वी शुभारंभाच्या दिवशी मंगळवारी (१ एप्रिल) सकाळी नऊ वाजता संगमनेर शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. त्यानंतर दुपारी श्रीराम कथा महात्म्य याद्वारे श्रीराम कथा सोहळ्यास सुरुवात होईल. या कथेदरम्यानच रामनवमीचा पावन पर्व असल्याने भाविकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. कथेदरम्यान भव्य राम सीता विवाहोत्सव संपन्न होणार आहे. तसेच श्री राधाकृष्णजी महाराज युवकांसोबत स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत.

कथे दरम्यान दुसऱ्या दिवशी (२ एप्रिल) श्री शिव-पार्वती विवाह, तिसऱ्या दिवशी (३ एप्रिल) श्रीराम जन्मोत्सव, चौथ्या दिवशी (४ एप्रिल) बाल लीला व धनुष यज्ञ, पाचव्या दिवशी (५ एप्रिल) श्रीराम-जानकी विवाह, सहाव्या दिवशी (६ एप्रिल) वनवास प्रसंग व केवट संवाद, सातव्या दिवशी (७ एप्रिल) श्रीराम भरत व श्रीराम शबरी भेट, आठव्या दिवशी (८ एप्रिल) हनुमान चरित्र व लंका विजय तर शेवटच्या नवव्या दिवशी (९ एप्रिल) श्रीराम राज्याभिषेक सोहळ्याने या कथेची सांगता होणार आहे.

या राम कथेचे सात सोपान असून यात बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किन्धाकाण्ड, सुन्दरकाण्ड, लंकाकाण्ड, उत्तरकाण्ड यांचा समावेश आहे. या श्रीराम कथा श्रवणाचा श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम कथा आयोजन समितीने केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,383
राधाकृष्णजी महाराज श्रीराम कथा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.