Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात महामानवाच्या विचारांचा जागर सुरू असतानाच डीजेचा धिंगाणा; राजकीय वादाने जयंती उत्सवाला गालबोट
धार्मिक

संगमनेरात महामानवाच्या विचारांचा जागर सुरू असतानाच डीजेचा धिंगाणा; राजकीय वादाने जयंती उत्सवाला गालबोट

सत्यजित तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महामानवाच्या विचारांचा जागर सुरू असताना अशा पद्धतीने अडथळे आणणे ही संगमनेरची संस्कृती नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या हतबलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर:

संगमनेर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात महायुतीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात डीजे लावून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. 

गेल्या ४० वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ माघाडे परिवाराच्या माध्यमातून वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा जोपासली जात आहे. मात्र, यंदा प्राध्यापक अहिरे यांचे व्याख्यान सुरू असतानाच समोरून डीजेचा कर्कश आवाज करून हा कार्यक्रम उधळून लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे संगमनेरची सांस्कृतिक आणि सामाजिक एकता धोक्यात आल्याचा आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

तालुक्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे पडसाद आता महापुरुषांच्या जयंती उत्सवातही उमटू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे शहरात प्रत्येक सण आणि उत्सवात दोन स्वतंत्र गट आमनेसामने येत असल्याचे चित्र आहे. प्रबोधन सुरू असताना वारंवार अडथळे निर्माण केले जात असल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महामानवाच्या विचारांचा जागर सुरू असताना अशा पद्धतीने अडथळे आणणे ही संगमनेरची संस्कृती नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या हतबलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार तांबे यांनी थेट माईकवरून पोलिसांना कडक सूचना दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आणि काही काळासाठी डीजे बंद करण्यात आला.

मात्र, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळावरून बाजूला होताच पुन्हा डीजे सुरू करण्यात आल्याने तणावात अधिकच भर पडली. या प्रकारामुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते आणि ८० वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुमताई माघाडे यांनी थेट डीजे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना जाब विचारला. व्याख्यान सुरू असताना अशा प्रकारे धुडगूस घालणे अत्यंत बेशिस्त आणि निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ महिलांशीही उद्धट वर्तन केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड नाराजी असून, साध्या वेशातील पोलिसांनी या गोंधळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप प्राध्यापक डॉ. शशिकांत माघाडे यांनी केला आहे.

संगमनेरमध्ये यापूर्वी गणेशोत्सव आणि इतर सणांमध्येही अशाच प्रकारे राजकीय चढाओढ आणि फलकबाजीवरून वाद झाले होते. मात्र, थेट महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात प्रबोधन थांबवून डीजे लावण्यापर्यंत या विकृत प्रवृत्तींची मजल गेल्याने सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. 

राजकीय दबावाखाली प्रशासन हतबल झाल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले असून, भरचौकात पोलीस बंदोबस्त असतानाही असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संगमनेरची शांतता आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भीम सैनिकांनी आणि सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 969
डिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.