Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी
न्यायालय

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी

न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार असून त्यानंतर जामीन मिळणार की कोरटकर न्यायालयीन कोठडीत मुक्कामाला राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/03/2025Updated:30/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कोल्हापूर, दि. ३० मार्च – 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर सध्या चर्चेत आहे. त्याला रविवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता प्रशांत कोरटकर याने तातडीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून यावर १ एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार असून त्यानंतर जामीन मिळणार की कोरटकर न्यायालयीन कोठडीत मुक्कामाला राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तेलंगणातून झाली अटक… काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर मंगळवारी (२५ मार्च) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर २८ मार्चला कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जामीनासाठी अर्ज… यानंतर प्रशांत कोरटकर तातडीने जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करणार आहे. जामिनासाठी अर्ज केल्यानंतर या प्रकरणात सुनावणी होणार असून प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोरटकरवर न्यायालयात हल्ला… दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी पोलिसांना जवळपास महिन्याभराचा कालावधी लागला होता. कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. शुक्रवारी कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात ४० ते ४५ मिनिटं युक्तिवाद झाला. त्यानंतर कोरटकर न्यायालयातच न्यायमूर्तींच्या आदेशाची वाट पाहत थांबला होता. न्यायाधीशांनी त्याची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली. यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. न्यायालयाच्या मागच्या दाराने त्याला बाहेर नेले जात होते. त्यावेळी वकिल अमितकुमार भोसले यांनी कोरटकर दिसताच त्यांनी त्याला हाक मारली. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का? असा सवाल विचारत भोसले कोरटकरवर धावून गेले. त्यांनी कोरटकरवर झडप घातली. यानंतर पोलिसांनी अमितकुमार भोसले यांना दूर केले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 535
इंद्रजीत सावंत कोल्हापूर न्यायालय प्रशांत कोरटकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.