Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील डॉ. अमोल कर्पेच्या पोलीस कोठडी संदर्भात न्यायालयाने दिला हा निर्णय…
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील डॉ. अमोल कर्पेच्या पोलीस कोठडी संदर्भात न्यायालयाने दिला हा निर्णय…

पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फरहाना पटेल करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/04/2025Updated:07/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी 

१६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी, संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल संताजी कर्पे (वय ४७ वर्ष) याला संगमनेरच्या अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सोमवारी १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. आता पोलीस चौकशीतून या अत्याचार प्रकरणी नेमकी काय माहिती समोर येते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

रविवारी रामनवमीच्या दिवशी पहाटे डॉ. कर्पे याने आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. रविवारी पहाटे सुमारे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात आलेल्या डॉ. कर्पे याने अल्पवयीन मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत तिला तू जरा बाहेर ये असे सांगून रुग्णालयाच्या टेरेसवर नेले होते. तेथे त्याने या मुली सोबत लज्जास्पद वर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर डॉ. कर्पे तेथून पसार झाला होता. दरम्यान पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याने व तेथे मोठा वाद निर्माण झाल्याने ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी देखील घटनास्थळी घाव घेतली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तात्काळ आरोपी डॉक्टरच्या शोधासाठी तपास यंत्रणांना अलर्ट केले होते. डॉ. कर्पे याला नाशिकच्या अंबड भागातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक  समीर अभंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला तेथून संगमनेरमध्ये आणले. दरम्यान पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी कर्पे याच्याविरुद्ध बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान डॉ. कर्पे याला या गुन्ह्यामध्ये संगमनेर पोलिसांनी रविवारी रात्री ११ वाजता अटक करत सोमवारी उशिराने न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयात व न्यायालयाच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान न्यायालयामध्ये सहाय्यक सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी आरोपी डॉ. कर्पे याने केलेला गुन्हा हा त्याला कायद्याचे ज्ञान असताना केलेला असून त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा व स्त्री अत्याचाराचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय तपासासाठी आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सरकार आणि आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर आरोपी डॉ. कर्पे याला दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फरहाना पटेल करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 5,097
अमोल कर्पे अल्पवयीन मुलीवर अत्याचार जिल्हा व सत्र न्यायालय पोलीस कोठडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.